सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : पावसाळा तोंडावर आला असतानाही कल्याण पूर्वेतील नाल्यांची सफाई झालेली नाही. आमदार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर तत्परतेने कारवाई करणारे पालिका प्रशासन नालेसफाई कामावर किती लक्ष देते, असे म्हणत शुक्रवारी आमदारांनी अधिकाऱ्यांसह पूर्वेतील विठ्ठलवाडी नाल्याची पाहणी केली. या वेळी नाल्याची सफाई पाहून ही नालेसफाई नाही, पालिका तिजोरीची हातसफाई असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे.
विठ्ठलवाडी येथील नाले पाहणी करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना आमदार घेऊन गेले. त्या ठिकाणी नाल्यात गाळ, कचरा तसाच असल्याने ही सफाई कधी होणार, असा प्रश्न आमदारांनी विचारला. मोठ्या नाल्याची ही स्थिती, तर आतील छोटे नाले कसे असतील, अशीही शंका त्यांनी उपस्थित केली. नालेसफाईची कोट्यवधीची बिले काढायची आणि वाटून घ्यायची. नालेसफाई नव्हे, ही पालिकेच्या तिजोरीची सफाई, असा आरोप गायकवाड यांनी पालिका अधिकाऱ्यांवर केला. तसेच दोन दिवसांत ही कामे झाली पाहिजेत, नाही तर माझ्यासोबत पुन्हा पाहणी करायची, असा सज्जड दमदेखील आमदारांनी अधिकाऱ्यांना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.