मुंबई

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १८) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या अंधेरी-गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
----
मध्य रेल्वे
कुठे-
ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर
कधी- सकाळी १०. ४० ते दुपारी ३.४० पर्यंत
परिणाम-
या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या नियमित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील; तर कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत अप-डाऊन मार्गावर जलद लोकल सेवा गंतव्यस्थानावर १० मिनिटे उशिरा पोहोचतील.
...........
हार्बर रेल्वे
कुठे-
पनवेल-वाशी अप आणि डाउन मार्गावर
कधी- सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम-
ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. पनवेल येथून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकरीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर-खारकोपर आणि नेरूळ-खारकोपरदरम्यान लोकल वेळापत्रकानुसार धावतील.
..........
पश्चिम रेल्वे
कुठे -
अंधेरी- गोरेगाव अप-डाऊन धीम्या मार्गावर
वेळ- सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम-
ब्लॉक कालावधीत अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावर चालवल्या जातील. त्यामुळे प्लॅटफॉर्म न मिळाल्याने या गाड्या राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉकदरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील, तर काही बोरिवली लोकल गाड्या गोरेगावपर्यंत चालवल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या गुरुजनांना मानाचा मुजरा, गुरु-शिष्याची अनोखी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

Mumbai News: ताडदेवस्थित वेलिंग्डन हाइट्सचे प्रकरण; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार, कोर्टात काय घडलं?

SCROLL FOR NEXT