मुंबई

उसने दिलेले पैसे परत मागितल्याने हत्या

CD

खर्डी, ता. १६ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील शिवनेर गावाजवळ शेतात एक अनोळखी मृतदेह ११ जून रोजी आढळला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे; तर एक आरोपी फरारी आहे. मित्राने उसने दिलेले १६ लाख रुपये वारंवार मागून तगादा लावल्याने फरारी आरोपीने दोघा मित्रांच्या मदतीने हत्या केली असल्याचे स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
कल्याण (चक्की नाका) येथील गोपाळ रंग्या नायडू (वय ६२) हे बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेने पथके बनवून तपास सुरू केला होता. मृतदेहाची ओळख पटवून घेतली व गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन तांत्रिक तपास सुरू केला. अरुण जगन्नाथ फर्डे (वय ३२, रा. धसई, फर्डेची) व सोमनाथ रामदास जाधव (वय ३५, कल्याण, खडकपाडा) यांना सापळा रचून ताब्यात घेतले. या दोघांकडे तपास केले असता फरार आरोपीने मृत गोपाळ नायडू यांच्याकडून १६ लाख रुपये उसने घेतले होते. ते पैसे गोपाळ वारंवार फरार आरोपीकडे मागत होता. त्यामुळे गोपाळचा राग मनात ठेवून तिघांनी मिळून गोपाळची हत्या केली असल्याची कबुली अरुण व सोमनाथ यांनी दिली असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT