मुंबई

कोस्टल रोड प्रकल्पामुळे भरतीच्या काळात दिलासा मिळणार

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणाऱ्या कोस्टल रोडच्या कामाला वेग आला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी टप्प्याअंतर्गत १६ ठिकाणी फ्लड गेट्सची यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे भरतीच्या काळात मुंबई शहरात समुद्राचे पाणी शिरणार नसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. कोस्टल रोडचे काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.

कोस्टल रोडअंतर्गत वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये ही यंत्रणा कार्यरत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आधीच्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या क्षमतेच्या तुलनेत अधिक क्षमतेच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. एकूण १६ फ्लड गेट्सच्या वापराच्या माध्यमातून मुंबईत भरतीच्या काळात शिरणारे पाणी रोखणे शक्य होणार आहे. एकूण १४ ठिकाणी फ्लड गेट्सच्या यंत्रणेचे काम पूर्ण झाले असून मरीन ड्राईव्ह परिसरात या फ्लड गेटच्या कामासाठी लवकरच सुरुवात होणार आहे. अतिवृष्टीच्या काळात शहरातील पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यासाठीही ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. कोस्टल रोडअंतर्गत शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. प्रकल्पाच्या एकूण चार पॅकेजेसमध्ये १६ फ्लड गेट्स लावणार असल्याची माहिती उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर यांनी दिली. मुंबई शहरात समुद्राचे पाणी शिरण्यापासून दिलासा मिळण्यासाठी फ्लड गेट्सची कामगिरी महत्त्वाची ठरेल, असे मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी यांनी सांगितले.
सध्याच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा या प्रकल्पाचा भाग आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी या टप्प्यात पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून सध्याच्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या तुलनेत दोन पट क्षमतावाढ करण्यात आली आहे. सध्याच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या वाहिन्या आणखी १०० मीटर पुढे समुद्रात सोडण्यासाठीची व्यवस्था देखील यामध्ये करण्यात आली आहे. सध्याच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची क्षमता अनेक ठिकाणी २ हजार मिमी तर काही ठिकाणी २५०० मिमी करण्यात आली आहे. तसेच फ्लड गेटच्या माध्यमातून समुद्राचे पाणी भरतीच्या काळात रोखण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. सध्या पॅकेज १ आणि २ मध्ये प्रत्येकी ६ तसेच पॅकेज ४ मध्ये ४ फ्लड गेट्स लावण्यात आले आहेत. त्यापैकी ७ ठिकाणी काम पूर्ण झाले असून उर्वरीत ठिकाणी काम प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---
दोन बोगदे खोदले
कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. कोस्टल रोड प्रकल्पात दोन भूमिगत बोगदे खोदण्यात आले आहेत. एका बोगद्याचे काम १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले. तर दुसऱ्या बोगद्याचे काम ९ एप्रिल २०२२ मध्ये सुरु झाले आणि ३० मे रोजी हे काम पूर्ण झाले.
......
प्रकल्प ७६ टक्के पूर्ण
ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ झाला. त्यानंतर २०२० कोरोनाचे संकट आल्याने कामाची गती कमी झाली. मात्र कोरोना नियंत्रणात आल्यानंतर कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरु झाले. १६ जूनपर्यंत ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर प्रकल्पाचे संपूर्ण काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेचे असणार आहे.

कोस्टल रोडची वैशिष्टे
- कोस्टल रोडमुळे ७० टक्के वेळेची व ३४ टक्के इंधनाची बचत
- ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण कमी होणार मदत
- ७० हेक्टर हरित क्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह
- सुरक्षित, जलद आणि कमी खर्चात प्रवास
- सागरी किनाऱ्याची धूप कमी होणार तसेच वादळी लाटा व पुरापासून संरक्षण होईल
- हाजीअली व महालक्ष्मी मंदिर धार्मिक स्थळांजवळ तसेच वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : देहूनगरीत आज संत तुकाराम महाराज यांचा 378 वा बीज सोहळा

SCROLL FOR NEXT