सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १६ ः आगामी लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने आपापसांतील कोणतेही मतभेद परस्पर चर्चेने बंद दरवाजाआड सोडवण्यावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये एकमत झाल्याचे समजते. शिंदे पितापुत्र-फडणवीस यांची याबाबतची चर्चा सफल झाल्याचे सांगितले जात आहे.
कल्याण-ठाणे परिसरातील नाराजीवरून सुरू झालेले हे युद्ध जाहिरातीत फडणवीसांना डावे दाखवल्यामुळे शिगेला पोहोचले होते. या वादामुळे दोन्ही गटांचे नुकसान होऊ शकेल, हे लक्षात घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सामोपचाराचे धोरण स्वीकारायचा निर्णय घेतला आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही दोघांच्या या धोरणाला मान्यता दिली आहे, असे समजते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून अडचणीतून मार्ग काढू, त्यांना समजावून सांगू, असे फडणवीस म्हणाल्याची चर्चा आहे. शिंदे गटानेही जाहिरातीसह काही गोष्टी बेबनावाचे कारण ठरल्या होत्या, हे मान्य केले अन् भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजी घेण्याचे ठरवल्याचे कळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.