मुंबई

राष्ट्रीय आमदार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी लोकशाहीच्या बळकटीकरणाची प्रतिज्ञा

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १६ : देशातील तब्बल दोन हजार दोनशे आमदार, खासदारांनी एमआयटीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आमदार अधिवेशनात भारतीय लोकशाहीच्या भविष्याबद्दल चिंतन करण्यात आले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संवाद हाच लोकशाहीचा आत्मा असल्याचे प्रतिपादन या वेळी केले. देशाच्या कानाकोपऱ्यांतून आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधून आलेल्या आमदारांनी गोलमेज चर्चा आणि विविध संकल्पनांवर आधारित समांतर सत्रांमध्ये विचारमंथन केले.

आमदार परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांच्या अनुषंगाने मांडण्यात आलेल्या ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम इनोव्हेशन एक्स्पो’च्या उद्घाटनाने झाली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील, डॉ. मीरा कुमार आणि सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड आणि एनएलसीचे समन्वयक राहुल कराड हेही व्यासपीठावर होते. या वेळी आमदारांना संबोधताना ओम बिर्ला म्हणाले की, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, बाळ गंगाधर टिळक, संत नामदेव, आणि सावित्रीबाई फुले यांची आहे. या जागेचा, भूमीचा स्वतंत्र असा प्रभाव आहे आणि आज महाराष्ट्रात आपण पुन्हा एक नवा संकल्प करत आहोत. नवीन दृष्टिकोन निर्माण करत आहोत. आपली विधिमंडळे अधिक मजबूत कशी करता येतील, यावर चर्चा आणि चिंतन करण्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत. पुढील दोन दिवसांमध्ये आमदार विविध विषयांवर चर्चा करणार आहेत, त्या मंथनातून अनेक विचार पुढे येतील आणि भारतीय लोकशाहीचे नेमके सार काय आहे, याचा जगभर प्रसार होईल.


--
एनएलसी भारत हे व्यासपीठ भारतातील संसदीय व्यवस्थेची मूल्ये अधिक बळकट करेल. पंतप्रधान मोदींनी गेल्या ७५ वर्षांच्या कालखंडाला ‘अमृत काळ’ असे संबोधले आहे. या काळात भारताला विकसित राष्ट्र बनवणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. माझ्या मते, या परिषदेसाठी उपस्थित असलेला प्रत्येक जण कोणती ना कोणती महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपले विचार आणि मार्ग कदाचित वेगळे असले, तरी आपले साधन एकच आहे- लोकशाही आणि भारताला नवीन उंचीवर पोचवणे, हेच आपले ध्येय आहे. शेवटी, आपल्या सगळ्यांचे ध्येय समान आहे. आपल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांसह, आपण आपल्या ध्येयाकडे एकत्र वाटचाल करणे आवश्यक आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT