मुंबई

कल्याणमध्ये बेशिस्त वाहन चालकांना दणका

CD

कल्याण, ता. १८ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवलीतील बेशिस्त वाहनचालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम सुरू असून, कल्याण पूर्व कोळशेवाडी वाहतूक पोलिसांनी लोढा पलावा, काटई, बदलापूर चौक या ठिकाणी वाहतूक विभागाने फ्लॅश डिप्लॉयमेंट करून मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कलमान्वये बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात कारवाई केली. यात विनाहेल्मेट ७२, विनासीटबेल्ट २२, सिग्नल मोडणे ९०, काळ्या काचा ६, गणवेश न घालणे ११ अशा एकूण ३६७ वाहनचालकांवर कारवाई करून चार लाख १५ हजार ९०० रुपये इतका दंड आकारण्यात आला असून त्यापैकी १९ हजार १०० रुपये दंड जागीच वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेत कोळसेवाडी वाहतूक विभागाचे तीन अधिकारी, दहा पोलिस अंमलदार आणि दहा वॉर्डन, तसेच डोंबिवली उपविभागाचे दोन अंमलदार व कल्याण उपविभागाचे दोन पोलिस अंमलदार असे एकूण तीन अधिकारी, १२ अंमलदार, १० वॉर्डन यांचा समावेश होता. या कारवाईदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांनी मोटार वाहन नियमांचे पालन करण्याची माहिती देणारे फलक दाखवून जनजागृतीसुद्धा केली, अशी माहिती वाहतूक विभाग वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Chhatrapati Sambhajinagar: दोन कोटी लिटर पाणी आले पाइपलाइनमध्ये दुसऱ्या दिवशीही चाचणी : संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पोचले पाणी

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar: आझाद चौक रस्त्यावर ३२ अतिक्रमणे हटविली; दुकाने, शेड हटविले

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आतुर ! अमेरिकेने इराणला पाठवला १५ कलमी शांतता प्रस्ताव, काय आहेत अटी ?

SCROLL FOR NEXT