मुंबई

कांदा-बटाटा बाजारात धुसफूस

CD

तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने धोकादायक बांधकामांच्या जाहीर केलेल्या यादीत बाजार समितीमधील कांदा-बटाटा बाजारातील गाळ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या गाळ्यांचा वापर थांबवण्याच्या सूचना बाजार समितीने गाळेधारकांना केल्या आहेत. मात्र, स्टक्चरल ऑडीटनुसार बाजारातील गाळे डागडुजी करून वापरण्यायोग्य असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आल्याने व्यापाऱ्यांवर विनाकारण कारवाई करू नये, अशी मागणी कांदा-बटाटा आडत महासंघाच्यावतीने बाजार समितीकडे केली आहे.
कांदा-बटाटा बाजारातील गाळे गेल्या २० वर्षांपासून धोकादायक इमारतींच्या यादीत आहेत. तेव्हापासून बाजारातील या गाळ्यांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न न्यायालयात आहे. त्यावर अजूनही अंतिम निर्णय येणे बाकी आहे. त्यामुळे एकीकडे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दुसरीकडे महापालिकेने धोकादायक इमारतींच्या यादीत बाजार समितीतील सर्व गाळे व्यापाऱ्यांना त्वरित खाली करून वापर थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, त्यावर व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला असून बाजारातील गाळे तळमजला प्रकारातील असल्याने त्यावर कोणतेही इतर बांधकाम नसल्याने गेल्या २० वर्षांत एकही प्राणांतिक अपघात झाला नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपापल्या गाळ्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती करून त्यांचा वापर करण्यास हरकत नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका, तसेच बाजार समितीकडून गाळ्यांच्या वापरावरून व्यापाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईला विरोध दर्शवला आहे.
-------------------------------------
अहवालातील प्रमुख मुद्दे ः
- एपीएमसीतील गाळ्यांचे मे स्ट्रक्चरवेल डिझायनर्स अँड कन्सल्टन्ट यांच्यावतीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यानुसार बाजारातील गाळे सी, टू, बी, या प्रकारात मोडत आहेत. या अहवालानुसार गाळ्यांची देखभाल, डागडुजी करून वापर करता येणे शक्य आहे.
- कांदा-बटाटा मार्केटमधील सामायिक कँटीन, स्वच्छतागृह, तसेच त्या लगतचा परिसर आणि शेतमाल चढ-उतार धक्क्यावरील स्लॅब कमकुवत झाले असल्याचे या अहवालात नमूद आहे.
- बाजारातील गाळ्यांची डागडुजी करत राहिल्यास आणखी २० वर्षे बाजारातील बांधकामाला काही होणार नाही, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT