मुंबई

प्रत्येक खांबाचे भूमिपूजन करा...

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून कल्याण पूर्वेतील लोकग्राम पादचारी पुलाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. सोहळा पार पडत नाही, तोच या सोहळ्यावरून कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना ट्विट करत कामाच्या गतीवरून सुनावले. ‘माझी चमकेश सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की पाहिजे तर दर आठवड्याला प्रत्येक खांबाचे भूमिपूजन करा; पण हा पूल लवकरात लवकर लोकांच्या सोयीसाठी तयार कसा होईल ते पाहा’, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कल्याण पूर्व रेल्वेस्थानक परिसरातील लोकग्राम पदाचारी पूल पाडून त्याची नव्याने बांधणी करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून हे काम केले जात आहे. या पुलाच्या कामाचे शनिवारी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजप व शिंदे गटाचे नेते तसेच पालिका प्रशासन अधिकारी उपस्थित होते. यावेळी या पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या पुलाच्या कामावरून कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांचा चमकेश, असा उल्लेख करत टोला लगावला आहे.


काय आहे ट्विट
गेली अनेक वर्षे रखडलेल्या कल्याण रेल्वे स्थानक येथील लोकग्राम पादचारी पुलाचे आज पुन्हा एकदा जोरात भूमिपूजन झाले. खरेतर जानेवारीत हे काम चालू झाले आहे; परंतु कामाची गती अगदीच मंद आहे. माझी चमकेश सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की पाहिजे, तर दर आठवड्याला प्रत्येक खांबाचे भूमिपूजन करा; पण हा पूल लवकरात लवकर लोकांच्या सोयीसाठी तयार कसा होईल ते पाहा. तुम्हाला पुढील भूमिपूजनासाठी मनसे शुभेच्छा!
#लोकग्राम_पुल #lokgram_bridge

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Visa Services: भारतीय प्रवाशांना अलर्ट! UAE मध्ये पासपोर्ट आणि व्हिसा सेवा बंद राहणार; जाणून घ्या नेमके कारण

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत भोर–राजगड–मुळशीतील १७ रस्त्यांसाठी १९७ कोटींची मंजुरी; १३० किमी रस्ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi Live Updates: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मुंबई विमानतळावर दाखल

विहिरीत उतरल्यावर समोर आली भूतकाळातील धक्कादायक रहस्ये! पाहा कसा आहे 'घबाड-कुंड' चित्रपट?

Mumbai Electricity: मुंबईत रिंग नेटवर्क उभारणार, १५ हजार कोटींचा खर्च; वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवरचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT