मुंबई

अंबरनाथला लोकलचा डबा घसरला

CD

अंबरनाथ, ता. १८ (बातमीदार) : ठाणे-कल्याण मार्गावर रविवारी (ता. १८) रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे १० मिनिटे गाड्या उशिराने धावतील, असा अंदाज रेल्वेने जाहीर केला होता; मात्र सकाळीच अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक सुमारे दोन तास विस्कळित झाली होती. ८ः३० च्या दरम्यान ठप्प झालेली रेल्वे वाहतूक १०ः३० वाजता हळूहळू पूर्ववत आली. लोकल रिकामी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथला रात्री मुक्कामी असलेली लोकल साइडिंग मार्गिकेवरून रविवारी सकाळी ८.२५ वाजता अंबरनाथच्या फलाटावर येत होती. त्याच वेळी अचानक मुख्य मार्गिकेवर येणाऱ्या लोकल गाडीचा एक डबा रुळावरून घसरला. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मोठ्या परिश्रमानंतर रेल्वेरुळावरून घसरलेला लोकलचा डबा उचलून रेल्वेरुळावर आणला. त्यानंतर सकाळी १०.४० वाजता डाऊन दिशेकडील लोकल सेवा सुरू करण्यात आली. याशिवाय सकाळी १०.४५ वाजता डाऊन एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेसला मार्गस्थ करण्यात आली. लोकल रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हा अपघाता कसा घडला यासंदर्भात चौकशीचे आदेश रेल्वेकडून देण्यात आले आहे.

----------------
एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका
या घटनेचा लोकल गाड्यांना आणि लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका बसला. मुंबईहून विशाखापट्टणमला जाणारी लोकमान्य टर्मिनस विशाखापट्टणम एक्स्प्रेस अंबरनाथ रेल्वे थांबवण्यात आली होती. त्यामागे बदलापूर आणि अंबरनाथ लोकल उल्हासनगर रेल्वे स्थानकावर रोखण्यात आल्या. या अपघातामुळे बदलापूर ते कर्जत भागातील सेवा चालू ठेवण्यात आली होती. रविवार असल्याने रोजच्या तुलनेत प्रवाशांची संख्या कमी होती; तरीही उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकल खोळंबल्याने वाट पाहून प्रवाशांनी चालत चालत अंबरनाथ रेल्वे स्टेशन गाठणे पसंत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mysore Sandal Record Turnover : 110 वर्षांची परंपरा अन् 2000 कोटींची झेप! 'म्हैसूर सँडल'ने रचला इतिहास; नफ्याचा आकडा वाचून थक्क व्हाल

Jalna News: मंठा शहरातील सुगंधानगरात दुर्गंधी!; घंटागाडी फिरकेना; नाल्या कचऱ्याने तुडुंब, डासांचाही प्रादुर्भाव

Jalna News: रुंदीकरणानंतर हरवली सिल्लोड रस्त्याची हिरवळ; वृक्षलागवड टाळून कंत्राटदाराकडून विश्वासघात, सावलीचा रस्ता बनला ‘काँक्रीट पट्टा’

Wedding Special: साडीऐवजी ३०० वऱ्हाडींना ‘ज्ञानेश्वरी’चा आहेर; कदम परिवाराचा आदर्श, विठ्ठलवाडीतील विवाह सोहळ्यात वाचन संस्कृतीचा संदेश..

Sim Card Rules : रिचार्ज न केल्यास सिमकार्ड किती दिवसांनी बंद होतं? नवा नियम आहे खूपच फायद्याचा

SCROLL FOR NEXT