मुंबई

उत्तनमध्ये ‘बांगलादेश’चे फलक !

CD

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : उत्तन परिसरातील चौक येथील एका भागाचा सरकारी कागदपत्रात बांगलादेश असा उल्लेख असल्याचे दिसून आले आहे. या भागात बंगाली भाषक लोकांची वस्ती असल्यामुळे स्थानिक या भागाचा बांगलादेश असा उल्लेख करतात; मात्र सरकारी कागदपत्रातही त्याचा तसाच उल्लेख आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मनसेने शनिवारी (ता. १७) सायंकाळी आंदोलन करत बस थांब्यावरील बांगलादेश या नावावर काळे फासले आहे.
उत्तनमध्ये बहुसंख्येने कोळी समाज राहतो. मासेमारी नौकांवर काम करणाऱ्यांमध्ये बंगाली भाषक लोकांचाही समावेश आहे. चौक येथील एका भागात हे बंगाली भाषक राहतात. त्यामुळे या भागाला बांगलादेश म्हणून संबोधले जाते. हे नाव एवढे प्रचलित झाले आहे की येथील लोकांच्या आधार कार्ड तसेच मालमत्ता कराच्या देयकांवरही पत्ता म्हणून बांगलादेश असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय या ठिकाणी असलेल्या बस थांब्यालाही बांगलादेश म्हणून नाव देण्यात आले आहे.

------------------
मूळ इंदिरानगर नावाचा विसर
सध्या बंगाली भाषक ज्या ठिकाणी राहतात, त्या भागाला इंदिरानगर असे म्हटले जाते; परंतु त्याऐवजी सरकारी दस्तऐवजात बांगलादेश हे नाव आल्यामुळे स्थानिकांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. काही वर्षांपूर्वी भाईंदर पश्चिम येथील एका भागालादेखील बांगलादेश म्हणून संबोधले जात होते. महापालिकेच्या मालमत्ता कराच्या देयकातही तसा उल्लेख आला होता. त्याविरोधात प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महासभेत रीतसर ठराव करून कराच्या देयकात गांधीनगर असा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता उत्तनमधील चौक परिसरातील या भागाचाही बांगलादेश म्हणून उल्लेख असल्याने तो चर्चेत आला आहे.

------------------
उत्तनमधील बस थांब्याला, तसेच अन्य कागदपत्रांमध्ये बांगलादेश असा उल्लेख करण्यात आला असल्याबद्दल माहिती घेण्यात येत आहे. या नावात योग्य ते बदल करण्यात येतील.
- अनिकेत मानोरकर, अतिरिक्त आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT