मुंबई

वाहतुकीसाठी रेल्वे अंडरपासमधून पर्यायी व्यवस्था

CD

बोर्डी, ता. १८ (बातमीदार) : पश्चिम रेल्वेवरील गुजरात राज्यातील संजाण रेल्वेस्थानकाच्या उत्तरेला रेल्वे फाटक बंद करून उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाण पुलाला उद्‍घाटनापूर्वीच भगदाड पडल्यामुळे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तोपर्यंत संजाण रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेला असलेल्या अंडरपासमधून वाहनांची वाहतूक करण्यासाठी रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला सुमारे अर्धा किलोमीटर पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे.
बिपरजॉय वादळाच्या दरम्यान झालेल्या हलक्या पावसातच ५० कोटी रुपये खर्च करून रेल्वे मार्ग क्रॉसिंग करण्यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाला उद्‍घाटनापूर्वीच भगदाड पडल्याचे लक्षात आल्यावरून खळबळ माजली होती. या कामाची पाहणी केल्यानंतर प्रशासनाने पुलाच्या पूर्वेकडील भागाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संपूर्ण स्लॅब तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण करताना बराच कालावधी लागेल, असे गृहीत धरून उड्डाण पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे; परंतु संजाण पश्चिम भागात असलेले उद्योग आणि उद्योगधंद्यातून उत्पादित होणाऱ्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ लक्षात घेता पर्यायी मार्गाची अत्यंत आवश्यकता लक्षात घेऊन रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला तातडीने खडीकरण करण्यात आले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी या रस्त्याचा वापर करावा, अशी सूचना देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT