मुंबई

‘आदिपुरुष’मधील संवाद बदलणार

CD

मुंबई, ता. १८ : ओम राऊत दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’चे संवाद वादात सापडल्याने ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या संवादांवर आक्षेप आहे ते बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतल्याचे संवादलेखक मनोज मुंतशीर यांनीच ट्विट करत सांगितले आहे.
हा चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आता प्रदर्शनानंतरदेखील वाद संपलेला नाही. चित्रपटाच्या प्री-बुकिंगदरम्यानच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरभरून कमाई केली; परंतु आता चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटातील संवादांबाबत वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटातील हनुमानाच्या तोंडी असलेले संवाद ऐकून प्रेक्षक निराश झाले आहेत. त्याचसोबत चित्रपटातील काही आणखी संवाद आहेत जे प्रेक्षकांना आवडलेले नाहीत. चित्रपटातील संवादलेखकावर प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. ‘जली ना तेरी, अब और जलेगी’, ‘लंका लगा देंगे’, ‘तेरी बुवा का बगीचा है जो हवा खाने आ गया?’, ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की... तो जलेगी भी तेरे बाप की’ आदी संवाद या चित्रपटात आहेत. हे संवाद प्रेक्षकांना आवडलेले नाहीत. आता समाजमाध्यमावर यासंबंधी चर्चा रंगली आहे.
या संपूर्ण वादावर आता चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशीर यांनी भाष्य केले आहे. लेखक मनोज मुंतशीर यांनी या चित्रपटात चार हजारांहून अधिक संवाद लिहिले आहेत. त्यांनी लिहिलेल्या ५- ७ संवादांवर लोकांनी आक्षेप घेतला आहे. ज्या संवादांमुळे जनतेच्या भावना दुखावत आहेत, ते संवाद बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतला आहे, असे मुंतशीर म्हणाले. पुढील आठवडाभरात हे संवाद बदलले जातील, असेही त्यांनी सांगितले आहे. मनोज यांनी ट्विट करत ही माहिती दिली. काही दिवसांतच या चित्रपटाची सुधारित आवृत्ती चित्रपटप्रेमींसमोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samarjitsinh Ghatge BJP : समरजितसिंह घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश, पहिलीच प्रतिक्रिया हसन मुश्रीफांवर; "आमच्यात वैर..."

War Ceasefire Impact: युद्ध थांबलं, आता महागाईवर ब्रेक लागणार? मजबूत रुपयामुळे तुमच्या खिशाला कसा फायदा!

MPSC Success Story: वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून गाठले यशाचे शिखर; विक्रम पाडळेची कर सहाय्यकपदी निवड, अंत्यविधी दिवशीच एमपीएससीची परीक्षा!

कंत्राटदारांच्या बिलांना मंजुरीसाठी ७ टक्के कमिशनची मागणी, लाच घेताना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अटक

डोक्यावर टक्कल,भेदक डोळे ! वाढदिवसाला सुपरस्टार अल्लू अर्जुनची चाहत्यांना खास भेट; ॲटली सोबतच्या बिग बजेट सिनेमाचा पहिला लूक रिलीज

SCROLL FOR NEXT