Mumbai News  sakal
मुंबई

Mumbai News : खारघरचा खाडीकिनारा पालिकेकडे हस्तांतर, डेब्रिज माफियांना महापालिकेचा चाप

पालिकेच्या सर्वेक्षण विभागाकडून खाडीमधील पाण्याची क्षमता, खोली, परिसरात असलेल्या झाडांची संख्या, खाडीत किती गाळ आहे, किती जागांवर डेब्रिज आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News - खारघरला विपुल प्रमाणात नैसर्गिक संपदा लाभलेला खाडीकिनारा आहे. मात्र, डेब्रिज टाकून खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

त्यामुळे खाडी किनाऱ्यालगत नैसर्गिक तलाव, पक्षी अभयारण्य, तसेच वॉकिंग ट्रॅक उभारण्याचा पालिकेने संकल्प केला असून खाडीमधील पाण्याची क्षमता, खोली, परिसरात असलेली झाडे, तसेच उपलब्ध असलेल्या जागांचे सर्वेक्षण सुरू आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विस्तीर्ण खाडीकिनारा लाभलेल्या खारघर शहरात ४८ जमातींचे वेगवेगळे पक्षी आढळतात. खारघर सेक्टर १७ पासून २७ लगत असलेल्या या खाडी किनाऱ्यालगत पाणथळे, खारफुटीची झाडे या पक्ष्यांच्या अधिवासाचे ठिकाण आहे.

मात्र, खारघर सेक्टर १९ मुर्बी गाव आणि संजीवनी शाळेसमोर असलेल्या खाडी किनाऱ्यावर काही जणांकडून डेब्रिज टाकण्यात येत आहे. त्यामुळे खाडी परिसरातील पनवेल पालिकेकडे हस्तांतर झालेल्या परिसरात नैसर्गिक तलाव, पक्षी अभयारण्य तसेच वॉकिंग ट्रॅक उभारण्यात येणार आहे.

पाणथळ संवर्धनावर भर
पालिकेच्या सर्वेक्षण विभागाकडून खाडीमधील पाण्याची क्षमता, खोली, परिसरात असलेल्या झाडांची संख्या, खाडीत किती गाळ आहे, किती जागांवर डेब्रिज आहे. तसेच किती जागेवर विविध प्रकल्प राबवता येऊ शकतात, याविषयी सर्वेक्षण केले जात आहे. ज्या ठिकाणी डेब्रिजचा भराव टाकून खारफुटी आणि पाणथळ परिसर नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पालिकेकडून खाडी किनारा विकसित केल्यास खारघरच्या सौंदर्यात भर पडेल. तसेच सदर परिसर थंड असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरणार ठरेल.
- मेघनाथ ठाकूर, मुर्बी, ग्रामस्थ

पालिका खाडीलगत तलाव विकसित करीत असेल तर ही आनंदाची बाब आहे. मात्र, या प्रकल्पासाठी सीआरझेड प्राधिकरणाच्या आवश्यक मान्यतेसह नियोजन करणे गरजेचे आहे.
- नरेश सिंग, पर्यावरण प्रेमी

सेक्टर १९ लगत काही खाडी परिसर पालिकेकडे हस्तांतर झाले आहे. त्यामुळे भविष्यात काय करता येईल, याविषयी नियोजन, आराखडा तयार केला जाईल. परिसरात प्रकल्प हाती घेण्यापूर्वी सीआरझेड विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रकल्प हाती घेतला जाईल.
- संजय कटेकर, कार्यकारी अभियंता, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT