मुंबई

राजर्षी शाहू महाराज‘समाजपती’

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ ः छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण ‘गडपती’ म्हणून नावाजतो. त्याचप्रमाणे शाहू महाराजांचे सर्वस्पर्शी लोककल्याणकारी कार्य बघता त्यांना ‘समाजपती’ हीच उपाधी सार्थ असल्याचे मत अभिनेते, व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘राजर्षी शाहू विचार वारसा’ व्याख्यानावेळी ते बोलत होते.
राहुल सोलापूरकर यांनी मालिका आणि चित्रपटांमधून छत्रपती शाहू महाराजांची भूमिका साकारली आहे. ती साकारताना अनेक महिने शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या विचारांचा, त्यामागील मानसिकतेचे त्यांनी सखोल चिंतन करून अभ्यासही केला आहे. त्या अभ्यासाचे फलित म्हणजे व्याख्यानामधून आपल्यासमोर उभे राहिल्याचे या वेळी राहुल सोलापूरकर यांनी सांगितले. छत्रपती शाहू महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली अनेक माणसे जिवंत असल्याने त्यांची भूमिका साकारणे फार मोठे आव्हान असल्याचे सोलापूरकर यांनी सांगितले. तसेच अगदी लंडन म्युझियमपर्यंत जाऊन जुनी कागदपत्रे अभ्यासून, शाहू महाराजांचे व्यक्तिमत्त्व उभे करताना शाहू महाराजांसारखे दिसण्याप्रमाणेच त्यांचे विचार व मानसिकतेचा अभ्यास करून ही भूमिका साकारल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी शाहू महाराज हे दरबार भरवणारे राजे नव्हते, तर ‘शासन तुमच्या दारी’ या वाक्याची त्या काळात प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे ‘लोकराजा’ होते. तसेच महाराजांची कार्यपद्धती, त्यांची लोकांशी बोलण्याची आपुलकीची पद्धत याचे मूर्तिमंत दर्शन राहुल सोलापूरकर यांनी याप्रसंगी उपस्थितांना घडवले.
---------------------------------------------------------
छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे असलेला मनस्वीपणा हा लोकांशी त्यांच्या असलेल्या अनुभवातून आलेला होता. राहुल सोलापूरकर उत्तम अभिनेता असल्याने त्यांच्या रूपात प्रत्यक्ष शाहू महाराज आपल्याशी बोलत असल्याचा भास होत होता.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT