मुंबई

मनसेच्या वतीने शेतकऱ्यांना युरिया खताचे मोफत वाटप

CD

थोडक्‍यात

किन्हवली (बातमीदार) ः हंगामी शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीला प्रोत्साहन मिळण्याच्‍या उद्देशाने मनसेकडून तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना युरिया खताचे मोफत वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहापूर तालुका सचिव हरिश्चंद्र खंडवी यांच्या वतीने हे उपक्रम पार पडले. या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी शहापूर तालुक्यातील डोळखांब, कसारा, खर्डी, किन्हवली, वासिंद या विभागातील मनसैनिकांनी मेहनत घेतली. मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे उपतालुका संघटक दयानंद पाटोळे यांच्याकडे आधार कार्डसहित नोंदणी करण्याचे आवाहन शहापूर तालुका मनसेकडून करण्यात आले होते. त्यानुसार हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी नोंदणी करत मोफत खतवाटप उपक्रमाचा लाभ घेतला. या वेळी मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते खताचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT