मुंबई

जोगेश्वरीत रेशन दुकानांत प्लास्टीक सदृश्य तांदूळ?

CD

जोगेश्वरी, ता. ३ (बातमीदार) : दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या नागरिकांना सरकारमार्फत मोफत धान्यपुरवठा करण्यात येतो; मात्र रेशन धान्य दुकानात मिळत असलेले धान्य निकृष्ट असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता जोगेश्वरीतील धान्य पुरवठा करणाऱ्या दुकानांत प्लास्टिक सदृश तांदूळ सापडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे; मात्र याची माहिती मिळताच शिधावाटप अधिकाऱ्यांनी तांदळाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

जोगेश्‍वरी पूर्व येथील काही रास्त धान्य दुकानांत प्लास्टिक सदृश तांदूळ सापडल्याचा दावा केला जात आहे. यामुळे पुरवठा यंत्रणा सतर्क झाली आहे. हा तांदूळ जप्त करून तपासणीसाठी त्याचे नमुने पाठवण्यात आले आहेत. तांदळाच्या गोणीत काही प्रमाणात फोर्टीफाईड तांदूळ असतो. त्यामुळे सापडलेला हा तांदूळ प्लास्टिकचा आहे की फोर्टीफाईड तांदूळ आहे, याची खातरजमा केली जाणार आहे. जोगेश्‍वरी पूर्वच्‍या मेघवाडी येथील शिवम ट्रेडर्स रास्त धान्य दुकान क्रमांक यू-एमयूएम २६ ड १४१ तसेच इतर दुकानांमधून नागरिकांना वितरित केलेल्या तांदळात प्लास्टिक तांदूळ नुकतेच आढळून आले होते.

नागरिकांकडून भेसळीची माहिती माजी नगरसेवकांना मिळताच त्यांनी त्वरित साहायक शिधावाटप अधिकारी सुनील काकडे, संतोष म्‍हात्रे, सुहास जगताप, हेमंत परब यांच्‍या ही बाब निदर्शनास आणली. त्यानंतर दुकान क्रमांक २६ ड १४१ व दुकान क्र. ७३ मधील काही दुकानांत पाहणी केली. या पाहणीत भेसळयुक्‍त तादूळ वितरित होत असल्‍याचे आढळून आले. तसेच येथे वितरित होत असलेला गहू अन् तांदूळही निकृष्ट दर्जाचा असल्‍याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. याबाबत नगरसेवक बाळा नर यांनी वितरित होत असलेले तांदळाचे वितरण त्वरित थांबवावे. तसेच पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करावी अन् सर्व तांदळाच्‍या गोण्‍या बदलून द्याव्यात अशी मागणी केली. त्‍याप्रमाणे दोन्‍ही दुकानांतील प्‍लास्टिकयुक्‍त तांदूळ शिधावाटप अधिकाऱ्यांनी जप्‍त केले आहेत. तांदळाचे काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार असे आश्‍वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: शस्त्रसंधी झाली पण होर्मुझ बंदच! पुन्हा युद्ध सुरु होण्याचा धोका; विशेष परवानगी घेण्याचे जहाजांना मेसेज, नाहीतर...

Mulshi Bhalgudi fire: मुळशी तालुक्यातील भालगुडी लव्हाळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; सुदैवाने जीवितहानी टळली

Pune suspected rabies dog bite: म्हात्रे पूल परिसरात संशयित रेबिजग्रस्त श्वानाचा पाच जणांना चावा; महापालिकेच्या तत्परतेने अनर्थ टळला

Pune Municipal Corporation News: नगरसेवकांना खासगी सोसायट्यांमध्ये ‘स’ यादीतून कामे करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव; पुणे शहर सुधारणा समितीसमोर मागणी

Pune Overhead Cable Policy: ओव्हरहेड केबल गोंधळावर तोडगा; पुणे महापालिकेकडून भूमिगत केबलला प्राधान्य देत नवे धोरण, समिती स्थापन

SCROLL FOR NEXT