मुंबई

पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन विद्यार्थ्यांला मारहाण

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : डोंबिवली पूर्वेतील दावडी गावात एका अल्पवयीन विद्यार्थ्यांला दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दावडी गावातील नारायण महाविद्यालयाच्या बाहेरच शनिवारी हा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्याला पूर्ववैमनस्यातून ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. अल्पवयीन विद्यार्थी नारायण महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे यापूर्वी याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याशी मोबाईलवरून भांडण झाले होते. त्या रागातून आरोपी आणि त्याच्या नऊ साथीदारांनी शनिवारी संध्याकाळी महाविद्यालय सुटल्यानंतर बाहेर गाठले. तेथे त्याला आरोपी निखिल यादव, किसन आणि इतर आठ जणांनी जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली. तक्रारदार अल्पवयीन विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण केल्यानंतर आरोपी पळून गेले. अल्पवयीन विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''सर्वात जास्त पुरावे तर माझ्याकडे, विरोधी पक्षातले कोण-कोण नेते...'' मुख्यमंत्र्यांचं खरात प्रकरणावर सर्वात मोठं विधान

Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलमधील मराठी भाषिक शहरावर हल्ला, १०० अधिक लोक जखमी झाल्याचा दावा

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भारत सरकार काळजी घेतंय, पाकिस्तान, बांगलादेशची अवस्था बघा : मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT