मुंबई

कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परवान्याचे बस चालकाकडून उल्लंघन!

CD

प्रशांत कांबळे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : परिवहन विभागाच्या ‘कॉन्ट्रॅक्ट कॅरेज’ परवान्यातील तरतुदीप्रमाणे प्री-बुकिंग असेल तेव्हाच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांची वाहतूक करता येते. त्यात संबंधित चालकाकडे सर्व प्रवाशांची यादी असणे बंधनकारक आहे; मात्र मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शुक्रवारी (ता. ३०) खासगी बसच्या भीषण अपघातात ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’च्या बस चालकाने कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परवाना नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आले आहे. चालकाने नागपूरनंतर समृद्धी महामार्गावरील प्रत्येक थांब्यावरून प्रवासी घेतले होते. त्यामध्ये एकट्या वर्ध्यातून १३ प्रवासी बसले होते.

‘कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परवान्यानुसार बस आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये आपत्कालीन दरवाजा, अग्निशमन बंब, आपत्कालीन परिस्थितीत बसची काच फोडण्यासाठीची हातोडी, स्लीपर बस असल्यास चांगल्या दर्जाची वातानुकूलन यंत्रणा असणे अनिवार्य आहे. बस जेव्हा एका ठिकाणाहून प्रवाशांना घेऊन सुटते, तेव्हा त्या प्रवाशांची यादीही बस चालकाकडे असणे अनिवार्य आहे. त्यात प्रवाशाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी बंधनकारक आहे; मात्र अपघातग्रस्त बसमध्ये अशा कोणत्याही बाबी आढळल्याचे प्राथमिक अहवालात नमूद केलेले नाही.

नियम उल्लंघनाचा साधा उल्लेखही नाही!
राज्यात ‘स्टेज कॅरेज परमिट’नुसार केवळ राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) टप्पा वाहतुकीची परवानगी आहे; मात्र त्यानंतरही अनेक खासगी बसचालक सर्रास कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परमिटचे उल्लंघन करून ‘स्टेज कॅरेज’नुसार प्रवासी वाहतूक करतात. समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स बसच्या भीषण अपघाताचा परिवहन विभागाने प्राथमिक अहवाल दिला. त्यामध्ये कॉन्ट्रक्ट कॅरेज परवान्याचे उल्लंघन केल्याचा साधा उल्लेखही नसल्याचे समोर आले आहे.

नागपूरहून बसमध्ये बसल्यानंतर चालकाने प्रवासी घेण्यासाठी अनेकदा बस थांबवली. समृद्धी महामार्गावर ती ठिकाणे लक्षात आली नाहीत. यात वर्धा जिल्ह्यातीलही अनेक प्रवासी होते. बुट्टीबोरी येथील संजय ट्रव्हल्समधून आम्ही विदर्भ ट्रॅव्हल्सची ऑनलाईन तिकिटे काढली होती; मात्र ऑनलाईन डेटामध्ये आमच्या दोघांचे नावच नसल्याचे लक्षात आले.
- साईनाथ पवार, जखमी प्रवासी
-----------
कॉन्ट्रॅक्ट कॅरेजच्या नियमानुसार प्रवास सुरू होण्यापूर्वी प्री-बुकिंग असेल तर प्रवाशांना विविध ठिकाणाहून घेता येते. प्रवास सुरू होण्यापूर्वी बसमधील सर्व प्रवाशांची यादी चालकाकडे असणे अनिवार्य आहे. त्या यादीशिवाय इतर प्रवाशांना बसमधून नेता येत नाही. जर कॉन्ट्रॅक्ट कॅरेज नियमाचे उल्लंघन झाले असल्यास त्याप्रमाणे न्यायालयात खटला दाखल होईल. संबंधित परिवहन अधिकारी याबाबत निर्णय घेतील.
- जितेंद्र पाटील, सह परिवहन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT