मुंबई

गरोदर महिलांसह रुग्णांची गैरसोय

CD

पेण, ता. ४ (वार्ताहर) : कोकणातील मध्यवर्ती ठिकाण तसेच मुंबई-गोवा महामार्गालगत असणारे पेण उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अशातच गेल्या तीनचार महिन्यांपासून रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन बंद असल्यामुळे तालुक्यातील डोंगराळ भागातील शेतकरी, आदिवासी, कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
पेण तालुक्याची वाढती लोकसंख्या पाहता येथील वैद्यकीय सुविधा तोकडी पडू लागली आहे. अशातच अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी येणारा खर्च सर्वसामान्य रुग्णांसह नागरिकांना परवडणारा नाही. अशातच सध्या पावसाचे दिवस असल्याने आरोग्याचे विविध प्रश्न उद्भवणाऱ्या गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक इतरही आजारपण असलेले रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र गेल्या तीनचार महिन्यांपासून पेण उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन बंद असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे हे मशीन तात्काळ सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी केली आहे.
-------------------------------------------------
पेण उपजिल्हा रुग्णालयात शासनाच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाच्या वतीने दोनतीन महिन्यांपूर्वी आलेले सोनोग्राफी मशीन चालवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने हे मशीन बंद आहे. याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे.
- पांडुरंग गाडे, सहायक अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पेण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT