मुंबई

पादचारीपुलांना समस्यांचा घेरा

CD

घणसोली, ता. ६ (बातमीदार)ः नवी मुंबईतील रेल्वेस्थानके सध्या विविध समस्यांनी ग्रासली आहेत. अशातच स्थानकाच्या दोन्ही बाजूला विविध समस्यांचा वेढा असल्याने प्रवास करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ऐरोली, तसेच रबाळे रेल्वेस्थानकावरून ठाणे-बेलापूर महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पुलाची उभारणी केली आहे. मात्र, या पुलांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने समस्यांनी घेरले आहे.
पावसाचे दिवस सुरू असल्याने नवी मुंबईतील रेल्वेस्थानक परिसरात पाणी साचण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. रबाळे रेल्वेस्थानक त्याला अपवाद नाही. त्यामुळे रबाळे रेल्वेस्थानकाबाहेर रेल्वे मार्गावरून जाण्यासाठी उभारलेल्या पादचारी पुलाचा वापर प्रवाशांकडून केला जात आहे. यात एमआयडीसीमधील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, असे असतानाही या पादचारी पुलाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे विविध समस्या उद्भवत आहेत. पादचारी पुलाला लावण्यात आलेल्या काचा तुटलेल्या असून रात्रीच्या वेळी अंधारातून प्रवास करावा लागत आहे. तसेच असलेले उद्ववाहक बंद असल्याने अपंग, अबाल-वृद्धांचे हाल होत आहेत. त्यामुळे पालिकेने या पादचारी पुलांची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
------------------------------------------------
स्वच्छ सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह
ऐरोली विभागातून सेक्टर एकहून चिंचपाडा परिसराकडे जाणारा ऐरोली नाका पादचारी पुलाची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पादचारी पुलावर अस्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याकडे पालिका विभाग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. स्वच्छ शहर म्हणून मानाचा तुरा मिळवणारी नवी मुंबई महापालिका शहरातील अनेक ठिकाणांकडे दुर्लक्ष करत आहे.
़़़़़़ः---------------------------------------------------------
रबाळे रेल्वेस्थानक परिसरात पाणी साचत असल्याने पादचारी पुलाचा वापर करतो. मात्र, त्याची अवस्था खराब झाली आहे. उद्ववाहक बंद असल्याने ज्येष्ठ, तसेच अपंगांना विविध अडचणी येतात.
- नीलम म्हात्रे, प्रवासी
़़़ः-----------------------------------------------------------
ऐरोली नाका उड्डाणपुलाची गेल्या दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. नेहमी अस्वच्छता पाहायला मिळते.
- मिलिंद दांगट, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Sangli : शक्तिपीठ महामार्गातून सांगलीतील १९ गावे वगळली, नवीन मार्ग जयंत पाटलांची डोकेदुखी वाढवणार

Financial Risk Management : शेअर बाजार कोसळला तरी टेन्शन नाही! जोखीम व्यवस्थापनाचे 'हे' सोपे नियम प्रत्येक गुंतवणूकदाराला माहित हवेत

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढला हा अभिनेता; पत्नीच्या इच्छेसाठी घातला सगळा घाट; लग्नाचे फोटो व्हायरल

काय? १६७.२ कोटींना विकलं गेलं ‘यशोदा-श्रीकृष्ण’ चित्र, यात नक्की विशेष काय? Viral

Pune Crime : पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पोटच्या मुलीचा गळा दाबून मुलासह आईने विहिरीत मारली उडी, मुलाचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT