मुंबई

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आक्रमक

CD

तुर्भे, ता. ६ (बातमीदार): शिक्षण मंडळाकडून परीक्षेच्या कामाचे मानधन जाणूनबुजून उशिरा दिले जात आहे. त्यामुळे मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वाशी येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत.
मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावीच्या परीक्षा विषयक कार्याचे मानधन बारावीच्या निकालाबरोबर मिळावे, आधार क्रमांक एका महिन्यात द्यावा, यासाठी शिक्षक संघटनांनी वारंवार पत्रव्यवहार केला होता. अनेकदा भेटी घेऊन याबाबतचा पाठपुरावा केला गेला, पण मंडळाने मानधन दिलेले नाही. यापूर्वी बारावीच्या निकालांबरोबर शिक्षकांना मानधन मिळत होते, पण आता मंडळ मानधन देण्यासाठी चालढकल करू लागले आहे. त्यामुळे या शिक्षक हितविरोधी कार्याबद्दल निषेध करण्यासाठी विविध शिक्षक संघटना शुक्रवारी (ता. ७) दुपारी २ ते ४ या वेळेत वाशी येथील मुंबई विभागीय मंडळ कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत.
----------------------------
संघटनांनी नोंदवलेले आक्षेप -
- परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून ८ ते ९ महिने आधी ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये शुल्क जमा केले जाते. परीक्षा घेण्याचे, तसेच परीक्षेच्या मूल्यमापनाचे कार्य फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत संपते. तरी कामाचे पैसे द्यायला मंडळ टाळाटाळ करते. आता बारावीचा निकाल लागून महिनाभराचा कालावधी लोटला आहे, तरी अद्याप शिक्षकांना मानधन दिलेले नाही.
- मंडळाकडे नवनियुक्त शिक्षकांना शालार्थ क्रमांक देण्याचे कार्य आहे. हा क्रमांक मिळाल्यानंतरच शिक्षकांना वेतन मिळण्यास सुरुवात होते. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून या नवनियुक्त शिक्षकांची सर्व कागदपत्रे तपासून त्यांना नियुक्ती मान्यता देण्यात येते. पूर्वी नियुक्ती मान्यता मिळाली की लगेच वेतन मिळत असे. तसेच हा क्रमांक कमाल ३० दिवसांत द्यावा, अशा शिक्षण आयुक्तांच्या सूचना आहेत.
-----------------------------------
शिक्षण मंडळाने कारभार सुधारावा, तसेच वेळेत मानधन द्यावे, नवीन शिक्षकांना लवकर वेतन मिळण्यासाठी लगेच शालार्थ क्रमांक द्यावा, अन्यथा संघटनेला तीव्र आंदोलन करावे लागेल.
- प्रा. मुकुंद आंधळकर, विभागीय सरचिटणीस, शिक्षक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT