मुंबई

पालिकेच्या मैदानांवर जलकोंडी

CD

जुईनगर, ता. ७ (बातमीदार)ः आठ दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. जुईनगर विभागात अनेक ठिकाणी पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहे. अशातच पालिकेच्या मैदानांमध्येही पाणी साचल्यामुळे मुलांचा हिरमोड होत आहे.
शहरी भागामध्ये मुलांना खेळायला मैदानांशिवाय पर्याय नसतो. अशातच सध्या पावसाचा जोर असल्याने जुईनगरमधील सेक्टर २३ येथील पालिकेच्या मैदानात जास्त प्रमाणात पाणी साचले आहे. या मैदानात यापूर्वीच खड्डे पडलेले होते. त्यात आठवडी बाजार भरत असल्यामुळे संपूर्ण मैदानाची दुरवस्था झाली होती. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यामुळे या मैदानात पाणी साचलेले आहे. त्यामुळे खेळायला आलेल्या मुलांचा हिरमोड होत असून याकडे स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मैदानात चिखलाचे साम्राज्य असून लहान मुले मैदानात साचलेल्या पाण्याच्या डब्क्यांमध्ये खेळत असल्याने दुखापत होऊ शकते. त्यामुळे मैदानाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
-------------------------------------------
मैदानांबाबत पालिका उदासीन
मैदानांमध्ये पाणी साचल्याने विविध आजाराला देखील आमंत्रण देत असल्याचे पाहायला मिळते, तसेच हे मैदान जुईनगर गावाच्या बाजूला असल्यामुळे या मैदानात अनेक वाहनचालक गाड्या पार्क करत असतात. त्यात आठवडी बाजार भरतो. त्यामुळे या मैदानाची पूर्णपणे दुरवस्था झालेली आहे. अशातच मुलांना खेळण्यासाठी मैदाने बोटावर मोजण्याइतकीच असल्याने मुलांची गैरसोय होत आहे.
---------------------------------------
मैदानामध्ये गाड्या पार्किंग, आठवडी बाजारावर कडक कारवाई केली तर मैदान चांगले राहील. मुलांना खेळण्यासाठी हे मैदान असून त्याकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.
- अमर शेंडकर, नागरिक
-------------------------------------
नवीन खेळाडू घडवण्यासाठी मैदाने वाचवणे गरजेचे आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळेच पावसाळ्यात मैदानाची दुरवस्था झालेली आहे. नाहीतर भविष्यात मैदाने खेळण्याजोगे राहणार नाहीत.
- रमा कुऱ्हाडे, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT