मुंबई

तरुणपिढी व्यसनाधीनतेची शिकार

CD

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : अमली पदार्थांच्या सेवनामुळे विचार, भावना आणि वर्तणुकीसंबंधी मेंदूच्या कार्यात बदल होत जातो. तलफ आली की कोणत्याही परिस्थितीत अमली पदार्थांचे सेवन करून भागवण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे तरुणांनी अमली पदार्थांच्या आहारी न जाण्याचा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ओंकार माटे यांनी वाशीमधील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला आहे.
जागतिक अमली पदार्थविरोधी दिनाचे औचित्य साधून बुधवारी (ता. ५) वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि अमली पदार्थ विरोधी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. ओंकार माटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कोणतेही व्यसन वयाच्या २५ वर्षाच्या आत लागले तर ते सोडवणे अतिशय गुंतागुंतीचे होते. मात्र, ३५ वर्षांनंतर जर व्यसन लागले तर ते सोडवणे तितके गुंतागुंतीचे नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आवाक्याबाहेरची परिस्थिती निर्माण झाली की ताणतणाव, निराशा येते. त्यानंतर तरुणाई व्यसनांकडे वळत असल्याचे सांगितले. डॉ. अजित मगदूम यांनी अमली पदार्थांच्या समस्येला आंतरराष्ट्रीय कनेक्शन कसे कारणीभूत आहे, याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी मोकळा वेळ व्यायाम, मैदानी खेळ, ट्रेकिंग, संगीत, कला यामध्ये घालवून व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन केले.
-----------------------------------------------------------
पथनाट्यातून व्यसनावर भाष्य
अन्वय प्रतिष्ठान आणि के. जे. सोमय्या कॉलेज यांच्या विद्यमाने आयोजित पोस्टर मेकिंग स्पर्धेचे, तसेच अन्य स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. तसेच पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आयसीएल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘व्यसनमुक्तीचा एकच प्याला’ या पथनाट्याचे सादरीकरण केले.
--------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT