मुंबई

किन्हवली आरोग्य केंद्रात सिकल सेल अ‍ॅनिमिया निर्मूलन अभियान

CD

किन्हवली, ता. ६ (बातमीदार) : किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत असलेल्या पाच उपकेंद्रांत राष्ट्रीय सिकल सेल अ‍ॅनिमिया अभियानात शेकडो नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. सिकल सेल अ‍ॅनिमिया या रोगाचे २०४७ पर्यंत देशातून समूळ उच्चाटन व्हावे यासाठी २०२३ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती. त्यानुसार देशभर हे अभियान राबवण्यात येत आहे. किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत असलेल्या मुगाव, अल्याणी, खरीवली, नांदगाव, अस्नोली या पाचही उपकेंद्रांत सिकल सेल अ‍ॅनिमिया निर्मूलन अभियान राबवण्यात आले. या वेळी ५९७ नागरिकांच्या तपासण्या केल्या. यात १ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य पर्यवेक्षक लीलाधर धिंधले यांनी दिली. किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जागृती खादे, डॉ. नितीन नेटके, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुमेधा पातकर, आरोग्य सेवक रतन नागरे, डेटा ऑपरेटर कोमल विशे, सर्व आशा कर्मचारी, आरोग्यसेविकांनी अभियान यशस्वीरीत्या राबवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी RR नंतर आणखी एक संघ मैदानात, कर्णधारपदाची ऑफर; मराठमोळ्या खेळाडूची 'वापरा अन् फेकून द्या' अशी होणार अवस्था

SCROLL FOR NEXT