मुंबई

Thane: ठाण्यात ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना घेतले ताब्यात

CD

ठाणे: वेश्याव्यसायासाठी समाजमाध्यमांचा वापर करून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ग्राहकांपर्यंत तरुणींचे फोटो पाठवून चालवण्यात येणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

महिला दलाल बुलबुल बानो ऊर्फ बुलबुल हमीद खान (वय २४) आणि तिचा साथीदार रिक्षाचालक सुरेंद्र यादव (वय ३१) याला ठाणे गुन्हे शाखेच्या कक्षाने सापळा रचून अटक केली आहे. दलाल आणि रिक्षाचालकाच्या विरोधात भिवंडी येथील कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विविध लॉजिंग-बोर्डिंगमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने मंगळवारी (ता. ४) रात्रीच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजणोली बायपास येथील सॉलिटियर रेसिडेन्सी या लॉजिंग बोर्डिंगमध्ये सापळा रचला होता.

त्या वेळी महिला दलाल बुलबुल बानो ही शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ग्राहकांच्या व्हॉट्सॲप नंबरवर तरुणींचे फोटो पाठवून सौदा करत असताना आढळून आली. त्यानंतर गुन्हे पथकाने बुलबुल बानो आणि रिक्षाचालक सुरेंद्र यादव या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडील मोबाईलसह ७२ हजार ६० रुपये हस्तगत केले. शिवाय दलालाच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT