मुंबई

बदलापूरमध्ये ''महिलांचे मानसिक आरोग्य'' परिसवांद

CD

बदलापूर, ता. ६ (बातमीदार) : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक महिलांनी उपस्थिती लावली होती. या महिलांनी या परिसंवाद कार्यक्रमात घेण्यात आलेल्या सत्रात, वेगवेगळ्या कलेत सहभाग घेत स्वतःच्या सुप्त भावनांना वाट मोकळी करून दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या आजीव सदस्या व समाजसेविका प्रियांका दामले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या व मानसिक आरोग्यतज्ज्ञ सिद्धी घीवाला यांनी या परिसंवादात तीन सत्र घेतले. यात महिलांसाठी वेगवेगळे खेळ व इतर क्रीडा प्रकार घेतले. यात महिलांनी मनातील भावना व्यक्त कराण्यासाठी विविध खेळ घेण्यात आले. या माध्यमातून महिलांनीदेखील या खेळांमध्ये आनंदाने सहभागी होत स्वतःमधील सुप्त गुणांना वाट करून दिली. तसेच काही महिलांनी तर घरी, कुटुंबात अन् समाजात वावरताना अनेकदा आपल्या सुप्त भावना दडवून ठेवाव्या लागतात; मात्र आजच्या या परिसंवादाच्या माध्यमातून आम्हाला मोकळेपणाने या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करता आल्या असेही सांगितले.

घरातील सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना या महिला स्वतःकडे दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे या महिलांना अशा परिसंवादाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मोकळे व्यासपीठ उपलब्ध होते आणि मग ज्या स्त्रियांना खरंच मानसिक त्रास किंवा अडचणी असतील, त्यांच्या या मानसिक तक्रारी सोडवणे आम्हालादेखील सोपे जाते, असे सिद्धी घीवाला यांनी सांगितले. अनेकदा घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःकडे लक्ष देणे कठीण जाते. अशा वेळी कुटुंबातील इतर व्यक्तींच्या मानसिक आधारानेदेखील बळ मिळते. त्यातच सामाजिक स्तरावर असे कार्यक्रम राबवले तर नक्कीच महिलांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याचा फायदा होईल. आम्ही सामाजिक स्तरावर हे कार्यक्रम राबवत असतो, असे मत आयोजिका प्रियांका दामले यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT