मुंबई

सहा टन वजनाच्या लोखंडी पुलावर चोरट्यांचा डल्ला

CD

अंधेरी, ता. ६ (बातमीदार) : चोरट्यांनी चक्क सहा टन वजनाचा तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला एक लोखंडी पूल चोरी केल्याचा प्रकार मालाड परिसरात घडला आहे. मोठ्या विद्युत वाहिन्या नाल्यावरून पुढील बाजूस नेण्यासाठी हा पूल तात्पुरता उभारला होता. याप्रकरणी चार जणांना बांगूरनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने बुधवारी (ता. ५) त्यांना अटक केली आहे.

मालाडमधील मौलाना अब्दुल कलाम उद्यानामागे नाल्यावर अदाणी कंपनीकडून २०२२ मध्ये हा ९० फूट लांब, अडीच फूट रुंदीचा लोखंडी पूल बांधण्यात आला होता. विद्युत वाहिन्या नाल्याच्या पलीकडे टाकल्यानंतर हा पूल बाजूला ठेवण्यात आला होता. २६ जून रोजी तक्रारदारांनी परिसराला भेट दिली असता पूल गायब झाल्याचे दिसून आले. याबाबत कंत्राटदार कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्‍यांना विचारणा केली असता त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. याप्रकरणी बांगूरनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. त्यानुसार समशुद्दीन खान आणि रामचंद्र यादव या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी सहकाऱ्‍यांच्या मदतीने पूल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर जसवित लोटलिया आणि गौरांश वोरा याच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT