मुंबई

युनियन बँकेची ९१ कोटींची फसवणूक

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील विकसक के. जे. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध बँक फसवणूक प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे. आरोपी संचालकांनी युनियन बँकेची ९१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बँकेने कंपनीविरुद्ध तक्रार केल्यानंतर सीबीआयने कारवाई सुरू केली.

सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये संचालक कल्याण जे. जाधव, कल्याण काकडे, संतोष धुमाळ आणि अमोल पेगुडे, तसेच के. जे. इन्फ्राशी संबंधित दुसरी कंपनी विंग इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि विनोद कल्याण जाधव यांची नावे आरोपी म्हणून समाविष्ट आहेत. बँकेने दिलेल्या तक्रारीत आरोपी कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांनी बँकेकडून जादा रक्कम काढण्यासाठी स्टॉक-बुक, कर्जाचे तपशील आणि बनावट नफ्याचे आकडे, उत्पन्न याबाबत बनावट माहिती दिली होती. कंपनीने याचा फायदा घेत बँकेकडून क्रेडिट सुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत ९१ कोटींची फसवणूक केली.

सीबीआयने याप्रकरणी पुणे आणि परिसरात ठिकठिकाणी झडती घेतली. या कारवाईत आरोपींच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे, दस्तावेज, कॉम्पुटर हार्डडिस्क आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Pune-Bengaluru Highway Update : कराड उड्डाणपुलाचे काम पूर्ण, पण पुलाखालील 'अतिक्रमणांचे ग्रहण' सुटणार कधी? महामार्ग विभागासमोर मोठे आव्हान

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

Latest Marathi News Update : अकोल्यात अवैध जुगार अड्ड्यावर खदान पोलिसांची धाड; २७.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Social Media Addictive Features: ‘सोशल मीडिया’वर नियंत्रण शक्य? वापर कमी करण्यासाठी उपाय हवेत : उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT