मुंबई

एचसीएल टेक-बी प्रोग्रामसाठी ३८ हजारांहून अधिक नोंदणी

CD

एचसीएल टेक-बी प्रोग्रामसाठी ३८ हजारांहून अधिक नोंदणी
बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम
मुंबई, ता. १८ : समग्र शिक्षा अभियान आणि आयटी क्षेत्रील नामांकित ‘एचसीएल टेक’ कंपनीच्या माध्यमातून राज्यात सुरू असलेल्या ‘महाराष्ट्र यंग लीडर ॲस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या ‘एचसीएल टेक-बी’ या उपक्रमासाठी आतापर्यंत ३८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
महाराष्ट्र यंग लीडर ॲस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यासाठी मागील वर्षी एचसीएलसोबत राज्य समग्र शिक्षामार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातील एचसीएल टेक या उपक्रमासाठी २० हजार विद्यार्थ्यांना सशुल्क प्रशिक्षण देण्यात येत असून त्यासाठी या वेळी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवत त्यासाठी नोंदणी केली आहे.
‘एचसीएल टेक-बी’ या उपक्रमांतर्गत बारावी गणित विषय असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच सहा महिने सशुल्क प्रशिक्षण व सहा महिने लाईव्ह प्रोजेक्टस्वर काम करण्याची संधी मिळणार आहे. या सहा महिन्यांच्या आंतरवासिता कालावधीमध्ये दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता (स्टायपेंड) मिळेल. एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयटी प्रोफेशनल म्हणून पूर्णवेळ नोकरी, पगार व सोबतच उच्च शिक्षण घेण्यासाठीचेही नियोजन केलेले आहे. विद्यार्थ्यांचे बिटस् पिलानी, शास्त्रा, अमिटी, आयआयएम-नागपूर व केएल अशा नामवंत विद्यापीठांमधूनच उच्च शिक्षण पूर्ण केले जाईल. उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च काही प्रमाणात एचसीएल कंपनी स्कॉलरशिप स्वरूपात देणार आहे.

बारावी विज्ञान शाखेमधून किमान ६० टक्के व गणित विषयात ६० गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होता येईल. यासाठी www.hcltechbee.com या संकेतस्थळावर निःशुल्क नोंदणी केली जात असून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्‍यावा.
- कैलास पगारे, प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 270 अंकांनी वाढला; शेवटच्या तासात बाजाराने घेतला यू-टर्न, काय आहे कारण?

'चला हवा येऊ द्या २' मध्ये भाऊ कदम का नाही? प्रेक्षक नाराज; अखेर खरं कारण समोर

Pakistani Boat Raigad : रायगडच्या समुद्रात पाकिस्तानी संशयित बोट, गुप्तचर विभागाला मॅसेज; जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली बैठक

Shocking News: नवरदेव आणि वऱ्हाडींना मंडपातच बेदम चोपले, हॉस्पिटलमध्येच लावाले लागले लग्न, तिथूनच नवरीची पाठवणी; नेमकं काय घडलं?

IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्स जिंकायची तयारी...! टीम इंडियाची जबरदस्त रणनीती; जसप्रीत बुमराह आला आहेच, शिवाय...

SCROLL FOR NEXT