मुंबई

मनसेची ‘एक सही संतापाची’ आंदोलन

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : सध्या राजकारणात संपूर्ण पक्ष फुटण्याच्या घडामोडी घडत आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संताप आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या ८ आणि ९ जुलै रोजी राज्यभरात स्वाक्षरी मोहीम घेऊन ‘फक्त एक सही, संतापाची’ असे आंदोलन छेडणार असल्याची माहिती मनसेतर्फे देण्यात आली.

राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता राजकारणाचा चिखल झाला आहे. देशाला दिशा आणि विचार देणाऱ्या महाराष्ट्रातच हा किळसवाणा प्रकार सुरू आहे. निवडणुकीत एकदा का मत दिले, की राजकारणी लोकांना गृहीत धरू लागले आहेत. याच मानसिकतेमध्ये सध्या सर्व राजकीय पक्ष आल्याचे दिसते. त्यामुळे नागरिकांच्या मनातील चीड व्यक्त करण्यासाठी मनसेने राज्यभरात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

राज्यात सुरू असलेले राजकारण ज्या लोकांना आवडलेले नाही, त्यांना आपली चीड, संताप व्यक्त करायचा आहे, अशांनी या आंदोलनात सहभागी घेऊन फक्त संतापाची एक सही करायची आहे. राज्यभरातील जनतेने या आंदोलनात सहभागी होऊन आपला संताप व्यक्त करण्याचे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT