मुंबई

रुग्णवाहिकेतच गर्भवतीची प्रसूती

CD

वाडा, ता. ८ (बातमीदार) : वाडा ग्रामीण रुग्णालयात गर्भवतीला प्रसूतीसाठी दाखल केले होते. गुरुवारी (ता. ६) पहाटेच्या सुमारास प्रसूतीचा त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर ठाणे येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तिला रुग्णवाहिकेतून नेत असताना रस्त्यातच अंबाडी येथे पोहोचताच प्रसूती वेदना सुरू झाल्याने चालकाने रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला थांबवून प्रसूती केली.

वाडा ग्रामीण रुग्णालयात पूजा पंकज गिंबल (वय २१) या महिलेला प्रसूतीसाठी गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या रुग्णवाहिकेवरील डॉ. सुशील जाधव यांनी रुग्णालयात जाऊन महिलेची तपासणी केली. सोनोग्राफी अहवालामध्ये बाळ गर्भाशयात आडवे असल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे पुढील उपचारासाठी महिलेसह जाधव यांनी महिलेला १०८ रुग्णवाहिकेमधून ठाण्याच्या दिशेने रवाना केले. अंबाडीपर्यंत पोहोचताच पूजाला प्रसूती वेदना सुरू झाल्याने चालक नीलेश मोरे यांनी तत्काळ रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला थांबवली. जाधव यांनी लगेचच महिलेची तपासणी केली असता बाळाचे पाय बाहेर आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून बाळासह मातेला जीवदान दिले. या दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता ते दोघेही सुखरूप असल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. डॉ. जाधव यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठाणे ते वाडा हा प्रवास ६८ किमी असून वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागतो. गर्भवतीला प्रसूतीसाठी ठाणे येथे घेऊन जाताना अनेकदा रुग्णवाहिकेतच प्रसूती होते. या रुग्णवाहिकेला प्रशिक्षित डॉक्टर लाभल्यामुळे गरोदर मातांचा किंवा बाळांचे जीवावर बेतण्याचे प्रसंग टळत आहेत.
- मिलिंद कांबळे,
सहायक जिल्हा व्यवस्थापक, ठाणे-पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT