मुंबई

रमा-राघवसोबत विद्यार्थी दंग

CD

ठाणे, ता. ८ (बातमीदार) : ‘सकाळ स्कॉलर प्रश्नमंजुषा २०२३’ या स्पर्धेअंतर्गत ठाण्यातील मावळी मंडळ शाळेत शुक्रवारी विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कलर्स मराठी वाहिनीवरील रमा राघव या मालिकेतील निखिल दामले आणि ऐश्वर्या शेटे त्यासह सोनी मराठी वाहिनीवरील हास्यजत्रा मालिकेतील प्रभाकर मोरे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना या स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या; तर प्रभाकर मोरेंसह या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनासाठी खास गाऱ्हाणे घातले.
‘सकाळ स्कॉलर प्रश्नमंजुषा २०२३’ ही स्पर्धा १ जुलैपासून सुरू झाली आहे. या स्पर्धेत स्मार्ट वॉच, गिअरची सायकल, क्रिकेटचे किट, स्कूल बॅग, कंपास बॉक्स व उत्तेजनार्थ टिफीन बॉक्स अशा एक कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या तब्‍बल २४ हजारपेक्षा जास्त बक्षिसांचा समावेश आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सकाळ’तर्फे करण्यात येत आहे. या स्पर्धेअंतर्गत ठाण्यातील मावळी मंडळ विद्यालयात शुक्रवारी कार्यक्रम पार पडला. या वेळी निखिल दामले आणि ऐश्वर्या शेटे आणि प्रभाकर मोरे यांनी उपस्थित राहून या शाळेतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी ऐश्वर्या, निखिल आणि प्रभाकर यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना बोलते केले. अभिनयाची आवड कशी निर्माण झाली, अभिनय क्षेत्रात पदार्पण केव्हा केले, असे विविध गमतीशीर प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी या कलाकारांसोबत गप्पा मारल्या; तर या कलाकारांनीदेखील विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आनंदाने दिली. दररोज टीव्हीवर दिसणाऱ्या कलाकारांना आज प्रत्यक्षात बघितले याचा उत्साह विद्यार्थ्यांमधून ओसंडून वाहत होता. या वेळी प्रभाकर मोरेंसह विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनासाठी खास गाऱ्हाणे घातले. या कार्यक्रमात संस्थेचे सीईओ डॉ. नरेंद्र पाठक, संस्थेचे विश्वस्त सुधाकर मोरे, प्रभाकर सुर्वे, केशव मुकाणे, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीता मिरकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजली सोनार आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हर्षदा प्रधान उपस्थित होते.

......
‘सकाळ’ समूह आयोजित करत असलेले कार्यक्रम नेहमीच उत्तम दर्जाचे असतात. यापूर्वीसुद्धा ‘सकाळ’ समूहाच्या एका कार्यक्रमात मी उपस्थित राहिली होती. विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवणारी तसेच शालेय स्पर्धांसाठी त्यांना तयार करणारी ‘सकाळ स्कॉलर’ ही स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे.
- ऐश्वर्या शेटे, अभिनेत्री
..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT