मुंबई

कसारा स्थानकातनू सराईत दरोडेखोराला अटक

CD

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ७ : एका सराईत दरोडेखोराला कल्याण रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी कसारा रेल्वेस्थानकातून बेड्या ठोकल्या आहेत. स्वप्नील गोसावी असे या दरोडेखोराचे नाव असून त्याच्याजवळून दोन काडतूस, एक चाकू व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. नाशिक येथील पोलिस ठाण्यात दरोड्यासारख्या गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास कल्याण ते कसारादरम्यान एक तरुण प्रवास करत होता. याच दरम्यान या लोकलमधून प्रवास करणाऱ्या आरपीएफ जवानांचे लक्ष त्याच्याकडे गेले. या तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आरपीएफच्या जवानांनी त्याला हटकले. या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन काडतूस, एक चाकू आणि मोबाईल आढळून आला. आरपीएफने त्याला जागीच ताब्यात घेत कसारा रेल्वेस्थानकात कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिले. चौकशीदरम्यान त्याचे नाव स्वप्नील गोसावी असून तो नाशिकच्या दिशेने जात होता. स्वप्नीलविरोधात याआधी नाशिकमधील पोलिस ठाण्यात दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. कल्याण रेल्वे पोलिसांनी स्वप्नील गोसावीला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT