मुंबई

कोविड काळातही विकास झाली कामे

CD

बदलापूर, ता. ८ (बातमीदार) : सध्या बदलापूर शहरातील भ्रष्टाचाराचे राजकारण मोठ्या प्रमाणात रंगले आहे. अशात भाजप व त्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने पालिकेने केलेल्या सहाशे कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर पालिकेने आपल्यावरील आरोप फेटाळून लावण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात खुद्द आरोपीकर्ते संभाजी शिंदे यांनी हा घोटाळा झालाच नाही, तर ६०० कोटींची विकासकामे झाली असल्याचा खुलासा पालिकेकडे केला असल्याचे सांगितले. त्यामुळे नक्की भ्रष्टाचार झाला की नाही, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेतील ६०० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी नगरपालिकेच्या प्रशासकीय दालनात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी ६०० कोटी घोटाळ्याचा आरोप फेटाळून लावत, या संदर्भात खुद्द तक्रारकर्ते माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी ६०० कोटींचा भ्रष्टाचार नाही तर ६०० कोटींची विकास कामे झाली आहेत व प्रसारमाध्यमांनी याबाबतीत बातमी चढ्या स्वरूपात लावली असल्याचे स्पष्टीकरण शिंदे यांनी पालिकेला दिले असल्याचे मुख्याधिकारी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याचबरोबर संभाजी शिंदे, त्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने पालिकेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यातील शुभम महिला विकास मंडळ या ठेकेदारी कंपनीने बोगस कागदपत्रे सादर करून पालिकेतून प्रशासकीय कालावधीत जंतुनाशक फवारणीचे काम हाती घेतले व दोन वर्षे ही कामे केली यासंदर्भात या कंपनीने बोगस कागदपत्रे सादर केल्याचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला असून देखील, अद्याप बदलापूर नगरपालिकेने या ठेकेदारी कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने ती कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला असता मुख्याधिकाऱ्यांनी आम्ही या संदर्भात चौकशी करून त्या कंपनीवर काही कारवाई होत असेल तर ती करण्यास पुढाकार घेऊ, असे सांगितले.
तक्रारकर्ते संभाजी शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, याबाबत मुंबई महापालिकेच्या धर्तीवर चौकशी आयोग नेमून निःपक्षपणाने चौकशी व्हावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी हीच माझी भूमिका ठाम असून, या बाबतीत मी प्रशासन व संबंधित विभागाकडे तक्रार करणार आहे व लवकरच या भ्रष्टाचाराचे संपूर्ण पुरावे मी पत्रकारांसमोर सादर करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ohh No! भारतीय गोलंदाज जखमी, स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; असं नेमके काय घडले?

मनीष मल्होत्रांच्या रॅम्पवर सेलिब्रिटींचा जलवा! सगळीकडे आलियाच्या साडीची चर्चा, लूक पाहून चाहते घायाळ

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT