मुंबई

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वच्छतेचा जागर

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ ः संत-महात्म्यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. समाजाला सवय लावण्याआधी स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करावी, अशी संत गाडगे महाराज यांची शिकवण आहे. त्यांच्या शब्दांचे तंतोतंत पालन करीत नवी मुंबई महापालिकेने गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नव्या उपक्रमाला सुरुवात केली असून त्याविषयीची जागरूकतेवर भर दिला जात आहे.
नवी मुंबई महापालिकेतर्फे नेरूळ येथील एनआरआय कॉम्प्लेक्स १ सारख्या बहुनिवासी संकुलात शून्य कचराविषयक जनजागृती केली. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत अभियानाचे नवी मुंबई महापालिकेचे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी उपस्थितांना शून्य कचऱ्याचे महत्त्व विशद केले. घरातून जितका कमीत कमी कचरा घराबाहेर जाईल, तितके स्वच्छतेचे मानांकन उंचावेल, असे मत डॉ. बाबासाहेब राजळे यांनी सांगितले. यासाठी पालिकेच्या थ्री आर संकल्पनेचा प्रत्येकाने शक्य होईल तितका कमी कचरा निर्माण करण्याकडे लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे घरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरीता कम्पोस्ट बास्केटचा वापर करून ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर करण्याची प्रक्रिया घराघरात केली जावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच निरुपयोगी सुका-कचरा पुनर्वापरात आणावा, अथवा त्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी दिला जावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी स्वच्छतेची शपथ ग्रहण करत एकमुखाने ‘निश्चय केला, नंबर पहिला’ घोषणेचा गजर करण्यात आला.
-----------------------------------
प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवून कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. यासाठी सोसायटी पातळीवर जागरूकता गट निर्माण करण्यात येणार असून ज्या सोसायटीमध्ये ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जाणार आहे. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना इतरही सोसायट्यांमध्ये प्रबोधनासाठी पाठवले जाणार आहे.
- डॉ. बाबासाहेब राजळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT