मुंबई

एक्स्प्रेसच्या धडकेत रेल्वे कर्मचारी ठार

CD

खर्डी, ता. ८ (बातमीदार) : ट्रॅकवर काम करत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना एक्स्प्रेसने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. ७) रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान कसारा स्थानकाजवळ मरीआई मंदिरासमोर ही घटना घडली. या अपघातात अन्य तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. आद्यप्रसाद (मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान नाशिकहून मुंबईला एक्स्प्रेस जात होती. दरम्यान, कसारा स्थानकाजवळील मरीआई मंदिरासमोर चार कर्मचारी ट्रॅकवर सिग्नल यंत्रणेचे काम करत होते. दिवसभर तसेच रात्रीही पाऊस असल्यामुळे कर्मचाऱ्यांना एक्स्प्रेस आल्याचा अंदाज आला नाही. त्याचवेळी अचानक आलेल्या एक्स्प्रेसने चौघांनाही धडक दिली. या धडकेत एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य चार जण जखमी झाले आहेत.
या अपघातातील मृत आद्यप्रसाद हा यूपीचा रहिवासी होता. नुकताच तो रेल्वेमध्ये कामाला लागला होता. रिजवान आलम, नीलम मिश्रा व उमेश सिंग अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. हे तिन्ही अनुक्रमे कल्याण, नाशिक व इगतपुरी येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस व अधिकारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले. जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT