मुंबई

लैगिंक अत्याचारानंतर अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

CD

लैंगिक अत्याचार करून
व्हिडीओ केला व्हायरल

मालाडमधील खासगी क्लासेसच्या शिक्षकाला अटक

अंधेरी (बातमीदार) : एका १८ वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून त्‍याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या खासगी क्लासेसच्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. रुन्फस डेव्हीड तुपदल असे त्याचे नाव आहे. मालाडच्या मालवणी परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचारासह धमकी देणे आणि आयटी कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पीडित तरुणी ही मालाड परिसरात राहत असून नामांकित महाविद्यालयात शिकत आहे. ती मालाडच्या एका खासगी क्लासेसमध्ये जात होती. ११ जूनला ती क्लासमध्ये गेली असता तिला तुपदल याने ‘क्लासमध्ये जागा नसून तू माझ्यासोबत चल’ असे सांगून तिला मढ येथील त्याच्या घरी घेऊन आला. तेथे तिच्याशी लगट करून त्याने तिला प्रेम असल्याचे सांगितले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याचे मोबाईलवरून अश्‍लील व्हिडीओ बनविले. हा प्रकार कोणालाही सांगितल्यास हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे धमकाविले. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, काही दिवसांनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्‍याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या तरुणीने मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार देताच तुपदलविरुद्ध गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल केल्यानंतर तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला पोलिस कोठडी मिळाली असून त्याची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Sangli Bank Election : चंद्रकांत पाटील, विशाल पाटील यांच्यात गुफ्तगू; खासदारांकडून राहुल महाडिक यांना शुभेच्छा, सांगली जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्‍ट

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT