मुंबई

आंबेतमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

CD

श्रीवर्धन, ता. १० (बातमीदार) ः आंबेतमध्ये आरोग्‍य व्‍यवस्‍थेचा बोजवारा उडाला आहे. नुसते भव्‍य असे रुग्णालय उभारून जिल्‍हा प्रशासनाने हात झटकले आहेत. येथे आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्‍यामुळे जिल्‍हा प्रशासन आरोग्‍य व्‍यवस्‍थेच्‍या नावाखाली धूळफेक करत असल्याची टीका ग्रामस्‍थ करत आहेत.
आंबेत येथे भव्य रुग्णालय बांधण्यात आले आहे. मात्र येथे एक कायमस्वरूपी डॉक्टर किंवा कर्मचारी दिले गेलेले नाहीत. मार्च महिन्यात रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आंबेत येथील नवीन रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यानंतर महिन्याभरात एका डॉक्टरची नियुक्ती केली. मात्र काही दिवसांतच येथील डॉक्टर रजेवर गेले. या रुग्णालयाअंतर्गत येथील तीस गाववाड्यांचा समावेश आहे. मात्र येथील आरोग्य व्यवस्‍थेचे तीन तेरा वाजले आहेत. त्‍यामुळे खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे येथील तात्पुरता कारभार दिला आहे, तर उपकेंद्रातीलच कर्मचाऱ्यांना तिथे नेमले आहे. औषधांचा साठा उपलब्ध असला तरी फार्मासिस्ट नेमलेला नाही. प्रसूतीसाठी स्टाफ नर्सची कमतरता आहे. विशेष म्‍हणजे इंजेक्शन द्यायला ही नर्स उपलब्ध नाही. याशिवाय आरोग्य सहाय्यक, सहायिका तसेच शिपाई यांची कमतरता आहे. तसेच रुग्णालयात पिण्याच्‍या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. रुग्णांना बाहेरून विकतचे पाणी आणावे लागते.
....................................
प्रतिक्रीया
आंबेत रुग्णालयात पदे मंजूर आहेत. शासनाकडून पद भरती होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम इतर डॉक्टरांकडे दिले आहे. पाण्याची देखील सोय आहे.
- सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT