मुंबई

आरटीईच्या दुसऱ्या टप्प्यातील ३५९ विद्यार्थ्यांचा प्रवेश

CD

ठाणे, ता. १० (बातमीदार) : आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ करिता दुसऱ्या प्रतीक्षा यादीमध्ये ९६६ विद्यार्थ्यांची निवड झाली असून यापैकी केवळ ३५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती आरटीईच्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदविण्यात आली आहे. आतापर्यंत आरटीई अंतर्गत एकूण आठ हजार ९२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.
वंचित गटातील आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के आरक्षित जागांवर ऑनलाईन प्रवेश दिला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा महापालिका क्षेत्रातील आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाकरिता दुसऱ्या प्रतीक्षा यादीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून यामधून ९६६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या यादीतील विद्यार्थ्यांचा ७ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचा कालावधी देण्यात आला होता. हा कालावधी संपला असून केवळ ३५९ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्यात पाच तालुके आणि सहा महापालिका क्षेत्रातील २०२३-२४ करिता आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ६२९ शाळांनी नोंदणी केली होती. या शाळांमध्ये १२ हजार २६३ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी जिल्ह्यातील ३१ हजार ६५१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी पहिल्या निवड यादीत १० हजार ९९६ विद्यार्थ्यांची निवड झाली. यापैकी सात हजार १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून पाच हजार २५१ जागा शिल्लक होत्या. प्रतीक्षा यादीच्या पहिल्या टप्प्यात उर्वरित जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये दोन हजार ९७५ बालकांची निवड करण्यात आली होती, त्यापैकी केवळ एक हजार ५५८ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या ९६६ बालकांपैकी केवळ ३५९ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे.

तीन हजार जागा रिक्त
आतापर्यंत आरटीई अंतर्गत एकूण आठ हजार ९२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून अद्यापही तीन हजार ३३४ जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश कमी झाल्यामुळे या टप्प्यातील प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याची शक्यता ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
------
आरटीई प्रवेश प्रक्रिया
प्रक्रिया- जागा - निवड - प्रवेश - रिक्त जागा
निवड यादी- १२२६३ - १०९९६- ७०१२- ५२५१
प्रतीक्षा यादी १ - ५२५१ - २९७५ - १५५८ - ३६९३
प्रतीक्षा यादी २ - ३६९३ - ९६६ - ३५९ - ३३३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT