मुंबई

ऐरोली ते कटाई नाका उन्नत मार्ग प्रकल्पात अडथळे

CD

वाशी, ता. १० (बातमीदार) : ऐरोली काटाई उन्नत मार्गाच्या कामात अडथळयांची शर्यत सुरु असून ऐरोली पुल ते ठाणे बेलापुर मार्गामध्ये गणेशनगर येथील स्मशनभूमी जवळ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाची उच्च दबाची विद्युत वाहिनी गेली असल्याने याठिकाणी पिलर उभे करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपास येथील पिलर उभे करण्याचे काम बंद आहे.
याठिकाणी एमएमआरडीए क्षेत्राला विद्युत पुरवठा करणारी उच्च दाबाची विद्युत वाहिनी असल्यामुळे शटडाऊन करुन वाहिनी बदलावी लागणार आहे. त्यामुळे या ऐरोली कटाई उन्नत मार्गाच्या प्रकल्पात अडथळे निर्माण होत आहे. शनिवारी खासदार राजन विचारे यांच्या ऐरोली कटाई उन्न्त मार्गाच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी महावितरणच्या आधिकांऱ्याकडून येत्या दोन महिन्यामध्ये विद्युत वाहिन्या या बदलण्यात येतील, असे आश्वासन दिले गेले. तर एमएमआरडीएच्या आधिकांऱ्यांनी मे २०२४ पर्यत ऐरोली काटई उन्नत मार्गाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्पातील काम पुर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे ऐरोली काटाई उन्नत मार्ग सुरु होण्याला तारीख वर तारीख मिळत आहे. मे २०१८ मध्ये ऐरोली कटाई उन्नत मार्गाचे भुमिपुजन झाले होते. तर गेल्या पाच वर्षापासून या मार्गाचे काम सुरु आहे. कोरोनाकाळात कामगार नसल्यामुळे या उन्नत मार्गाचे काम संथगतीने सुरु होते. तर आता महावितरणच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यामुळे हे अडथळे निर्माण होत आहे.

दरम्यान खासदार राजन विचारे यांनी केलेल्या या दौऱ्यावेळी एमएमआरडीए अधीक्षक अभियंता साखळकर, कार्यकारी अभियंता राठोड, एमएसइबीचे अधीक्षक अभियंता गायकवाड, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनीचे अभियंता संजय वाडवे, नवी मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संजय बेंडे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, डी.आर. पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT