मुंबई

काँग्रेस पदाधिकाऱ्याला दोन लाखांचा चुना

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली,ता. १० : आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवित भाजप पदाधिकाऱ्याने काँग्रेस पदाधिकाऱ्याला दोन लाखांचा चुना लावल्याची घटना मुरबाड तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी मधुकर देसले (वय ५६) यांनी टोकावडे ग्रामीण पोलिस ठाण्यात संतोष पवार व जगदीश वाळिंब यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. संतोष हा ठाणे जिल्हा भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी आहे. तर त्याचा साथीदार जगदीश हा आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत ते नागरिकांची लुबाडणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरात मधुकर देसले हे राहतात. संतोष पवार याचे मुरबाड तहसील कार्यालयासमोर झेरॉक्सचे दुकान आहे. या दुकानात संतोष आणि मधुकर यांची २०२१ साली ओळख झाली होती. २५ ऑगस्टला पुन्हा दोघांची दुकानात भेट झाली. संतोष याने मधुकर यांच्याकडे पत्नीचे गहाण ठेवलेले दागिने सोडविण्यासाठी पाच दिवसांसाठी दोन लाख रुपये देण्याची मागणी केली होती. दोघांची ओळख असल्याने संतोषवर विश्वास ठेवत मधुकर यांनी संतोषला दोन लाख रुपये दिले. दरम्यान संतोषने मधुकर यांना आरोग्य विभागात नोकरीसाठी जाहीरात निघाली आहे. तुमच्या नातेवाईकांना नोकरी लावायची असेल तर सांगा, माझा नातेवाईक मोठा अधिकारी असून तो नोकरी लावून देण्याचे काम करेल असे सांगितले. या प्रलोभनाला बळी पडत देसले यांनी भाचा गणेश घोलप याच्या नोकरीसाठी संतोषला विचारणा केली. त्यानंतर २६ ऑगस्टला मुंबईतील ताज हॉटेलच्या लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये संतोषने तोतया आयपीएस अधिकारी जगदीश याच्याशी मधुकर यांची भेट घालून दिली. हॉटेलमध्ये बैठकीमध्ये भाचा गणेशचे नोकरीचे काम करण्यासाठी १० लाख रुपये द्यावे लागतील असे मधुकर यांना सांगण्यात आले. तर आगाऊ तीन लाखांची रक्कम द्यावी लागेल असे जगदीशने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत मधुकर यांनी एक लाख रुपये संतोष व जगदीश यांना दिले असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
अखेर ७ जुलैला मधुकर यांनी टोकावडे पोलिस ठाण्यात धाव घेत संतोष व जगदीश याच्या विरोधात तक्रार दाखल केली. सध्या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT