मुंबई

कचराकुंडीत सापडले नवजात अर्भक

CD

नालासोपारा, ता. १० (बातमीदार) : अनैतिक संबंधांतून अथवा नको असलेले मूल जन्माला आल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. अशा वेळी काही अर्भके वेळीच उपचार मिळाल्यामुळे सुरक्षित राहतात; तर अनेक अर्भके भटक्या कुत्र्यांची शिकार होतात. रविवारी (ता. ९) सकाळी विरारमध्ये एका कचराकुंडीत नवजात अर्भक सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. सापडलेले मृत अर्भक पुरुष जातीचे असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रविवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान नेहमीप्रमाणे पालिकेची कचरा उचलणारी गाडी विरार पश्चिमेच्या संजीवनी रुग्णालयाजवळील कचरा उचलण्यासाठी गेली होती. त्या वेळी सफाई कर्मचाऱ्यांना कचराकुंडीमध्ये एक नवजात पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. पालिकेची कचरा उचलणारी गाडी ही २४ तासांनंतर येते. त्यामुळे शनिवारी सकाळपासून ते रविवार सकाळपर्यंत कुणी तरी हे अर्भक टाकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून, हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीची तपासणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: सायकल ट्रॅक, जिम, 60 हजार झाडं... मुंबईला ‘सेंट्रल पार्क’ची भेट मिळणार! लंडन-न्यूयॉर्कला टक्कर देणार; काय सुविधा असणार?

Tilak Varma: श्रीलंका, तेलंगणा अन् थेट मुंबई! मित्राच्या शपथविधीसाठी तिलक वर्माची खास उपस्थिती,'मी त्याला लहानपणापासून...

आयुष्यातले तीन टर्निंग पॉइंट! चाहत्यांच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं उत्तर , म्हणाली...'काही लोकांना माफ तर...'

Latest Marathi News Live Update : पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत

Share Market Crash: शेअर मार्केट क्रॅश! सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले

SCROLL FOR NEXT