मुंबई

विरारमध्ये व्यावसायिकांवर ॲसिड हल्ला

CD

नालासोपारा, ता. १० (बातमीदार) : विरारमधील व्यावसायिकावर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी ॲसिड हल्ला केल्याची घटना उघड झाली आहे. यात व्यावसायिक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरार पूर्व मकवाना कॉम्प्लेक्सजवळ रविवारी (ता. ९) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. मोबिन आसमत शेख (४२) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
जखमी व्यावसायिक मोबिन शेख यांचा विरार पूर्व गोपचारपाडा येथे एलईडी लाईटच्या सर्व्हिसिंगचा व्यवसाय आहे. रविवारी शेख हे आठवडी बाजार आणण्यासाठी आपल्या स्कुटीवरून जात होते. त्याच वेळी विरार पूर्व मकवाना कॉम्प्लेक्सजवळ अंदाजे २२ वर्षांचे दोन युवक दुचाकीवरून शेख यांच्याजवळ आले. काही कळण्यापूर्वीच त्यांनी प्लास्टिक पिशवीतील ॲसिड शेख यांच्या मानेवर मारून फरार झाले. यात शेख यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना विरारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे, गुन्हे प्रकटीकरण प्रभारी पोलिस निरीक्षक दिलीप राख यांना समजतात त्यांनी तात्काळ एक पथक तयार करून, घटनास्थळावर पाठवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मुख्य रस्त्यावर हा ॲसिड हल्ला झाला असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

Uddhav Thackeray: ५ ऑक्टोबरचा पंचनाम्यांचा मुहूर्त कशासाठी? दुष्काळावरून उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! ब्लॉकमुळे ४ लोकल रद्द, दोन दिवस कल्याण-कसारा सेवा बंद; रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल

Marathi News Live Updates : राज्यात 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज

तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

SCROLL FOR NEXT