मुंबई

मेल-एक्स्प्रेसचा प्रवास आणखी सुरक्षित

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : मध्य रेल्वेला मेल-एक्स्प्रेसमध्ये स्मोक डिटेक्टर, फायर अलार्मसारख्या अग्निशमन यंत्रणा लावण्याची शिफारस रेल्वे सुरक्षा आयोगाने २०२१-२२ च्या अहवालात केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने मेल-एक्स्प्रेसमध्ये स्मोक डिटेक्टर लावण्याचे काम हाती घेतले असून, ते आता अंतिम टप्प्यात असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.

भारतीय रेल्वेतून दररोज अडीच कोटी प्रवासी प्रवास करतात. रेल्वे प्रवासात धूम्रपान करण्याची सक्त मनाई असतानाही काही प्रवासी सर्रास विडी-सिगारेट पितात. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये आगीच्या घटना घडतात. या घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे मेल-एक्स्प्रेसमध्ये स्मोक डिटेक्टर लावण्यात येत आहे. सध्या २०४ मेल-एक्स्प्रेसमधील साध्या कोचमध्ये (नॉन-एसी), याशिवाय २४ एसी कोचमध्ये स्मोक डिटेक्टर लागले असून उर्वरित एसी कोचमध्ये डिटेक्टर लावण्याचे काम सुरू आहे.

एलएचबी आणि आयसीएफ पेण्ट्री कार असलेल्या गाड्यांमध्येही स्मोक डिटेक्टर लागले असून दोन गाड्यांमधील डिटेक्टर लावण्याचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. याशिवाय १३७ पॉवर कारमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला दिली.

लोकलमध्येही लवकरच यंत्रणा
मुंबई उपनगरीय लोकलमध्ये स्मोक डिटेक्टर्स, ऑटोमेटिक फायर सुपर सेशन सिस्टीम बसवण्यात आलेली नाही. मध्य रेल्वेच्या ईएमयू आणि मेमू गाड्यांसाठी ६४६ बेसिक युनिट्समध्ये स्मोक डिटेक्टर्स आणि फायर अलार्म सिस्टीम लावण्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे. सध्या अग्निशमन यंत्रणा केवळ लोकलच्या मोटरमन आणि गार्डच्या केबिनमध्येच उपलब्ध आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलमध्येही ही यंत्रणा लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Farmers: पंचनामे कागदावर नको, थेट बांधावर करा; महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश; ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, तलाठींची उपस्थिती बंधनकारक

आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2026! प्रदोषामुळे खास दिवस; वाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Ahilyanagar Ganesh Visarjan : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू, आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन

Jharkhand Dhuska Recipe: एकदा खाल तर पोहे-उपमाही विसराल! असा बनवा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ झारखंडी धुस्का

SCROLL FOR NEXT