मुंबई

पाणीटंचाईचे संकट गडद

CD

हेटवणे धरणात शंभर दिवसांचा साठा
खारघर, ता. ११ (बातमीदार) : सिडकोच्या क्षेत्रातील खारघर, उलवे, तळोजा, द्रोणागिरी या परिसरांना पाणीपुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणात शंभर दिवस पुरेल, एवढा पाणी साठा आहे. अशातच राज्यात जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
जून महिन्यात दरवर्षी हमखास पाऊस पडतो. त्यामुळे धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे अपुरा पाऊस तसेच धरण क्षेत्रात पाणीसाठा उपलब्ध नसल्याच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या अखत्यारीतील नोड आणि गावांमध्ये पंधरा टक्के पाणीकपात जाहीर केलेली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने पाणी कपात रद्द केली जाते. मात्र, यंदा अजूनही धरण क्षेत्रात अपेक्षित पाणी पाऊस झालेला नाही. त्यामुळे हेटवणे धरणात शंभर दिवस पुरेल, एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने सिडकोकडून पाणीकपात केली जात आहे.
---------------------------------------
टँकरने पाणीपुरवठा सुरू
सिडकोकडून होणारा अपुरा पाणीपुरवठा तसेच कपातीमुळे खारघर, तळोजा वसाहतीत अनेक सोसायटीत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच अजूनही धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस झालेला नसल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन सिडकोने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT