मुंबई

तेनझींग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकने सादर करा

CD

पालघर, ता. ११ (बातमीदार) : खेल मंत्रालयाकडून दरवर्षी साहसी पुरस्कारांतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी १४ जुलैपर्यंत नामांकने मागवण्यात आलेली आहेत. या पुरस्काराची केंद्र शासनाद्वारे प्राप्त सर्वंकष माहिती सोबत जोडली आहे.
तेनझिंग नॉर्गे पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्यासाठी https://awards.gov.in या पोर्टलवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा. या पुरस्कारासाठी नामांकन करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षांमधील असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम जमीन, हवा किंवा पाणी या ठिकाणी केलेली असणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व साहसी उपक्रम करणाऱ्या खेळाडू, नागरिकांना केंद्र शासनाच्या वरील पोर्टलवर भेट देऊन तेनझिंग नॉर्गे पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक असणारे क्रीडा विभागाचे शिफारसपत्र प्राप्त करून घेण्यासाठी अर्जदारांनी त्यांचा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह क्रीडा विभागाच्या desk१o.dsys-mh@gov.in या ई-मेल आयडीवर किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात १२ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT