मुंबई

यंदा पाणी पट्टी वसुलीत वाढ

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : मालमत्ता कर वसुलीपाठोपाठ पाणीपट्टी वसुलीतदेखील गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी वाढ झाल्याचे सकरात्मक चित्र दिसून येत आहे. १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत १३ कोटी ८८ लाखांची पाणीपट्टी वसुली झाली असून गत वर्षीच्या तुलनेत यंदा या वसुलीत सुमारे साडेतीन कोटींची वाढ झाली आहे. ठाणे शहरात होणारे बदल, नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा यामुळे ठाणेकरांकडूनदेखील कररूपाने प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आह्रे.
कोरोनाचे सावट आल्याने २०२० मार्चपासून लॉकडाऊन झाला. त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावरदेखील झाला. तेव्हापासून बहुतांशी आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते; पण त्यानंतर पुन्हा पालिकेच्या मालमत्ता कर आणि पाणी पट्टीची वसुली सुरू झाली. यात मागील तीन वर्षांपासून उत्पन्नवाढीसाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली वसुलीची पाणी बिलवसुलीची ही मोहीम १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. मागील वर्षी १ एप्रिल ते ३० जूनदरम्यान १० कोटी ४० लाख ६३ हजार १२५ इतकी वसुली झाली होती; मात्र यंदा याच काळात सुमारे १३ कोटी ८८ लाख २४ हजार ५४ इतकी वसुली झाली आहे. त्यानुसार यंदा तीन कोटी ४८ लाखांची अधिकची वसुली झाली आहे; परंतु आता पाणी पुरवठा विभागाने आपले लक्ष थकबाकीदारांकडे वळविले असून ती वसुली करण्यासाठी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे समजते. मागील वर्षी पाणीपुरवठा विभागाला २०० कोटीचे लक्ष दिले होते. त्यापैकी १३४ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यंदा अद्याप ही पाणीपुरवठा विभागाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

IPL 2026: विराट-धोनी आमने सामने येणार नाहीतच! MS Dhoni च्या खेळण्याबाबत नवी अपडेट समोर

Nagpur Bhosale Descendants : शिवरायांशी नागपूरच्या भोसले घराण्याचे नाते काय? नव्या पिढीचे वंशज आता काय करतात? पाहा वीरांचा वारस

Aniket Verma Inspirational Jounery : ३ वर्षांचा असताना आईचे निधन; वडिलांचे दुसरे लग्न... हार्दिक पांड्याची 'मॅगी' स्टोरी अन्...

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

SCROLL FOR NEXT