मुंबई

ठाकरे गटाचे दुसरे अंबरनाथ शहरप्रमुखही शिवसेनेत

CD

अंबरनाथ, ता. ११ (बातमीदार) : अंबरनाथमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय सावंत यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेतील राजकीय घडामोडींनंतर सावंत हे शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेले दुसरे शहरप्रमुख आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबरनाथचे शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मीकी यांनी चार महिन्यांपूर्वी पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा कार्यकर्त्यांची जमवाजमव करत संजय सावंत यांना ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाची जबाबदारी सोपवली होती. सचिन अहिर यांच्या उपस्थितीत संजय सावंत यांनी शहरात ठाकरे गटाच्या शाखेचेही उद्‌घाटन केले होते. अशात खासदार आपल्या भेटीला या कार्यक्रमानिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शनिवारी अंबरनाथमध्ये आले होते. तेव्हा डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत संजय सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा शहरप्रमुख शोधण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! सोमवारी मध्यरात्रीपासून भाववाढीचा निर्णय, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Kalamboli Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा थरार! डॉक्टरनं पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडलं; लहान मुलांसह ४ जण गंभीर जखमी

Rahul Gandhi Defamation Case: पुण्यात राहुल गांधी मानहानी खटल्याला कडक कायदेशीर वळण! विशेष कोर्टातील उलटतपासात सात्यकी सावरकरांनी मान्य केला '१० दया याचिकां'चा ऐतिहासिक ताळेबंद

Kannad Accident : मद्यधुंद क्रूझर चालकाने बुलेटला चिरडले; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Pune Developer Death: बांधकाम व्यावसायिक कपिल गांधी यांचे हृदयविकाराने निधन

SCROLL FOR NEXT