मुंबई

डोंबिवलीतील श्री राम मंदिरात चोरी

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : डोंबिवली पूर्वेतील दावडी येथील श्री राम मंदिरात रविवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली. चोरट्याने मंदिरातील तीन दानपेट्यांचे कुलपे तोडून त्यातील १५ हजारच्या आसपास असलेली रोकड चोरून नेली आहे. चोरट्याने मंदिराच्या लोखंडी जाळीतील मोकळ्या जागेतून मंदिरात प्रवेश करत ही चोरी केली. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
डोंबिवली पूर्वेतील दावडी परिसरात १९८६ मध्ये उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिरात रविवारी चोरी झाली. दावडी परिसरातील हे सर्वात जुने मंदिर असून एवढ्या वर्षात प्रथमच मंदिरात चोरीची घटना घडली आहे. याप्रकरणी मंदिराचे व्यवस्थापक हरीशंकर पांडेय यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चोरट्याने मंदिरातील तीन दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम चोरली आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मध्यरात्री १२.३० च्या सुमारास चोरटा मंदिरात आला असल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय तर थांबा! आता CCTV बसविण्याच्या कामामुळे वाहतूक बंद, वेळ जाणून घ्या...

Maharashtra Sugar Mills: शेतकऱ्यांची १०० टक्के एफआरपी चुकती करा, मगच गाळप सुरू करा; साखर कारखान्यांसाठी आयुक्तालयाचे काय आहेत नियम?

Joanne Hicks: ५१ वर्षे १७१ दिवसांचं वय अन् हातात चेंडू! जोएन हिक्सने रचला अनोखा इतिहास; ९४ वर्षांचा विक्रमही मागे टाकला

Marathi News Live Updates : शिंदेंच्या मेळाव्यावरून इशारा दिल्यानंतर बच्चू कडूंचा जरांगेंना फोन

Theatre in Education : नाटक म्हणजे केवळ करमणूक नाही; शिक्षणातून माणूस घडवणारी प्रभावी कला

SCROLL FOR NEXT